पारंपरिक वास्तूंचे जतन आवश्यक
18424
पारंपरिक वास्तूंचे जतन आवश्यक
दिनकर सामंत ः कुडाळात ‘आयआयए’ची ‘आरंभ’ सभा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः कोकणातील ज्या जुन्या परंपरागत वास्तू, मंदिरे, सडे, सड्यावरचे मांगर हे वास्तुशास्त्राचे नमुने आहेत. त्यांना जपण्याचे काम झाले पाहिजे. त्यांचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. वास्तूविशारद म्हणून त्याकडे पहिले पाहिजे, तरच कोकणचा शास्वत विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन सिडकोचे माजी मुख्य आर्किटेक्ट दिनकर सामंत यांनी केले.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस (आयआयए) रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्राची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ‘आरंभ’ सभा आज येथील वासुदेवानंद हॉल येथे झाली. याप्रसंगी सामंत बोलत होते. महाराष्ट्र चॅप्टर चेअरमन आर्कि. संदीप प्रभू, रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्राचे मानद मार्गदर्शक संतोष तावडे, मकरंद केसरकर, गौरी सामंत, श्रेया इंदुलकर, ‘कॉनबॅक’चे संजीव कर्पे, क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, मोहन हो, अभिजित माने, संजीवकुमार प्रभू, ‘क्रांती सिरॅमिक्स’चे संचालक राजीव पवार उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, ‘कोकणात आरसीसी घरे, मंदिरे बांधण्याचे प्रमाण वाढत आहे. येथील संस्कृती टिकवून श्वाश्वत विकास झाला पाहिजे. इथली मंदिरे, सडे टिकले पाहिजेत. गणेश चतुर्थीच्या दरम्याने वास्तूविशारदांचे संमेलन घ्यावे.’ श्री. प्रभू यांनी ‘आयआयए संस्थेची १०८ वर्षे जुन्या संस्थेविषयी माहिती दिली. या जुन्या संस्थेशी रत्नसिंधूच्या माध्यमातून येथील वास्तू विशारद जोडेल गेले आहेत. त्यामुळे आपले प्रश्न, आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्याचा वापर करा, असे आवाहन केले. श्री. तावडे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात या संस्थेचे उपकेंद्र सुरू होते आहे, याचा आनंद असल्याचे सांगितले. अभिषेक माने, संजना शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले. शंकर सावंत, हर्षद सरवणकर, स्मिता बागवे, नीलेश गुंडेचा यांच्यासह इतर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

