मठ येथे शुक्रवारी बाळासाहेबांना वंदन
मठ येथे शुक्रवारी
बाळासाहेबांना वंदन
वेंगुर्ले ः मठ ग्रामस्थांतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. २३) मठ चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी नऊला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, रात्री आठला चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी (ता. कुडाळ) यांचा ‘क्षणमुखासूर-रुविनी संहार’ हे दशावतारी नाटक होणार आहे. या नाटकात संजय वालावलकर, विश्वजित परब, अर्जुन रेडकर, अजिंक्य गवस, काका मेस्त्री, पांडुरंग तांडेल, तुषार बांदेकर, मंगेश लाड, श्रीराम पाडगावकर, प्रशांत जोशी आदी कलाकार आहेत. संगीत साथ हार्मोनियम राजू गावडे, पखवाज संजय नाईक, तालरक्षक गौरव पांग्रडकर हे देणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दशावतार मंडळाचे चालक सुधीर दळवी, पुरस्कर्ते सतीश परब व व्यवस्थापक मठ ग्रामस्थांनी केले आहे.
.....................
रेडी नवदुर्गा देवीचा
२७ रोजी जत्रोत्सव
सावंतवाडी ः कनयाळ-रेडी येथील श्री देवी नवदुर्गा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २७ जानेवारीला साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ९ पासून महापूजा, आरती, सामुदायिक सांगणे व महाप्रसाद, सायंकाळी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत ओट्या मानवणे, रात्री ९ नंतर पुराणवाचन, काकडा धरणे, पालखी प्रदक्षिणा व दशावतारी नाटक, पहाटे दहिकाला असे कार्यक्रम होणार आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक, श्री देवी नवदुर्गा देवस्थान, कनयाळ-रेडी यांनी केले आहे.
........................
ओटवणेत गुरुवारी
माघी गणेश जयंती
ओटवणे ः ओटवणे कापईवाडी येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २२) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी दहाला श्री गणेशपूजन, साडेदहाला श्री सत्यविनायक महापूजा, साडेबाराला श्री गणेश अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती, दुपारी दीडला महाप्रसाद, सायंकाळी सहाला स्थानिक ग्रामस्थांचे भजन, सायंकाळी सातला बालकलाकारांचे मनोरंजनाचे कार्यक्रम, पावणेआठला महिलांचा फुगडीचा कार्यक्रम, रात्री सव्वाआठला दोनपात्री विनोदी नाटिका, रात्री साडेआठला श्री अष्टविनायक पारंपरिक दशावतार मंडळ (निरवडे) यांचा ‘माहेरवासिनी आई भवानी’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणेश मंदिर व्यवस्थापन समिती व श्री गणेश कला क्रीडा व विकास मंडळाने केले आहे.
....................
विलवडे शाळेचे
मंगळवारी स्नेहसंमेलन
ओटवणे ः विलवडे प्राथमिक शाळा क्र. २ चे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (ता. २०) रात्री आठला होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम दळवी तर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी, बांदा प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, बांदा माजी केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी केले आहे.
...................
वेंगुर्लेत विविध
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः श्री देव वांद्रेश्वर कला, क्रीडा मंडळाने गुरुवारी (ता. २२) माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त २२ ला गणपतीची मूर्ती स्थापना, २३ ला आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा ‘नारायणी महाकालेश्वर’ नाट्यप्रयोग, तसेच २६ ला सत्यनारायण महापूजा, २७ ला श्री स्वामी माऊली पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा ‘मूषक दैत्य’ नाट्यप्रयोग होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

