-कंटेनर उलटून महामार्गावरील वाहतूक विस्कळित

-कंटेनर उलटून महामार्गावरील वाहतूक विस्कळित

Published on

-rat१७p२२.jpg-
P२६O१८४५३
लांजा ः आंजणारी पुलाजवळ उलटलेला कंटेनर.
-----------
कंटेनर उलटल्याने वाहतूक विस्कळीत
आंजणारी पुलाजवळील घटना ; चालक बचावला
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १७ ः मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील आंजणारी पुलाजवळ भरधाव कंटेनर उलटला. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने मालवाहतूक करणारा कंटेनर अंजणारी पुलावरील तीव्र वळणावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. क्षणातच कंटेनर उलटून रस्त्यावर आडवा पडला आणि रस्त्यालगतच्या मातीमध्ये जाऊन कोसळला. अपघात इतका भीषण होता की, कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कंटेनर हटवून काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com