मुंबई-गोवा महामार्गाचे र''ख’रडगाणे
टुडे १ साठी - सकाळ विशेष
rat18p16.jpg
18559
खेड ः आवाशी येथे ओव्हरहेड ब्रिजचे काम सुरू असल्याने होत असलेली वाहतूक कोंडी.
-rat18p17.jpg-
18560
संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी पुलानजीक अर्धवट स्थितीत असलेले संरक्षक भिंतींचे काम.
rat18p18.jpg-
18561
गेली अनेक वर्षे रखडलेले संगमेश्वर तालुक्यातील जाखमाता मंदिरानजीकच्या महामार्गाची स्थिती.
rat18p19.jpg-
18562
महामार्गावर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पूर्ण झालेला काँक्रिटचा रस्ता खोदून ओव्हरहेड ब्रिज किंवा फुट ब्रिजचे काम सुरू आहे.
-------
सकाळ विशेष...लोगो
इंट्रो
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे. काम राजकीय इच्छाशक्तीअभावी आणि जोडीला राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या निष्काळजीपणामुळेही रखडले आहे. जे झाले, त्या कामाचा दर्जा नसल्याचा आक्षेप आहे. गेली अनेक वर्षे स्थानिक ग्रामस्थासह वाहनचालकामध्ये प्रशासनाविरोधात असंतोष पसरलेला दिसतो आहे. अनेक पक्षांनी यासंदर्भात विविध आंदोलने छेडली असून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. अनेक ठिकाणी ओव्हर ब्रिज, फूट ब्रिज, भुयारी गटारे, सव्हिर्स रोड अशी मागणी करुन देखील, या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले आहे. परंतु या राहिलेल्या त्रुटींमुळे अनेकवेळा अपघात घडत आहेत. भुयारी गटार योजना व्यवस्थित नसल्याने महामार्गावर पावसाळ्यात पाणी भरते. सव्हिर्स रोड किंवा फूट ब्रिज नसल्याने अपघाताचे धोके कायम आहेत. सद्यःस्थितीत महामार्गाचे रडगाणे अजूनही सुरूच आहे....!
- सिद्धेश परशेट्ये, खेड
----------
मुंबई-गोवा महामार्गाचे र''ख’रडगाणे
राजकीय इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह ; जे काम झाले त्यात त्रुटी, पैशाचा अपव्यय
मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते कासू दरम्यानचा खारपाडा आणि दूरशेत पूल हा मार्ग खड्डेमय आहे. कासू ते इंदापूरमधील आमटेम, कोलेटी, नागोठणे, खांब, पुईगाव, कोलाड, तळवली या भागातील बॉक्सवेल, उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची कामे पूर्ण आहेत. वाकण नदीवरील पूल खड्डेमय आहे. इंदापूर ते वडपाले दरम्यान इंदापूर आणि माणगाव पुलाचे काम अजूनही अपूर्ण आहे. कशेडी बोगद्यातील पाणीगळती थांबलेली नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना सावधानतेने वाहने चालवावी लागत आहेत. कसबा पूल, संगमेश्वर सोनवी नदीवरील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. तिथे अरुंद रस्ता आहे, बावनदी ते सोनगिरी संगमेश्वर टप्प्यात अनेक ठिकाणचे काम अर्धवट आहे. बावनदी ते निवळी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, पर्यायी रस्ता खराब आहे. टोलगेट ते कोकजे वठारमधील घाट भागही खराब आहे, निवळी-डांगरवाडी येथील उड्डाणपूल, हातखंबा येथील नवीन रस्त्याचे काम बाकी आहे. पाली उड्डाणपूल अपूर्ण असून बाह्यरस्ता खराब आहे. आंजणारी ते मठमधील काही काम अपूर्ण आहे. चिपळूण आणि लांजा येथील उड्डाणपूल व रस्त्याचे बरेच काम बाकी आहे.
----------
फुटब्रिज, ओव्हरहेड ब्रिजसाठी पुन्हा खोदाई
* खेड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. चौपदरीकरण केल्यानंतर येथील आवाशी- गुणदेफाटा, खेड रेल्वे स्थानक या ठिकाणी पूर्ण झालेला क्रॉक्रिटचा रस्ता पुन्हा खोदून फुट ब्रिज, ओव्हरहेड ब्रिज आणि संरक्षक भिंती आणि गटारांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या लक्षात आलेल्या गोष्टींची दुरुस्ती करण्यासाठी यापूर्वी केलेल्या कोट्यवधी रुपयाचा चुराडा केला जात आहे.
* खेड तालुक्यातील लोटे परशुराम या औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ अवजड व अतिअवजड वाहने नेहमी ये-जा करतात. ही समस्या लक्षात आल्यावर येथे राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या वतीने ओव्हरहेड ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे. खेड रेल्वे स्थानकानजीक देखील यापूर्वी करण्यात आलेला क्रॉंक्रिटचा रस्ता खोदून या ठिकाणी ओव्हरहेड ब्रिज उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच शिव फाट्यावर असलेल्या टोल नाक्यानजीक असलेल्या दाभिळ गावानजीक ग्रामस्थांच्या मागणीनुसार फुट ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे. या तिन्ही कामामुळे राष्ट्रीय महामार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे.
* महाड-नडगाव-ओव्हर ब्रीज, पोलादपूर-फुट ब्रीज, दाभिळ-फुट ब्रीज, खेड रेल्वे स्थानक-ओव्हर ब्रीज, आवाशी-ओव्हर ब्रीज. या संपूर्ण कामासाठी ४० कोटी रुपयांचा निधी खर्ची टाकण्यात येणार आहे. ही कामे संबंधित ठेकेदाराने मे महिना अखेरीस पूर्ण करावयाची आहेत.
* भोस्ते घाटातील अवघड वळणावर रुंदीकरण, सपाटीकरण व नव्याने संरक्षक भिंत यासाठी अंदाजे ३५ कोटी रुपयांचे निधी मंजूर करण्यात आला आहे हे काम देखील मे अखेरपर्यंत पूर्ण करावयाचे आहे.
----------------
फसलेले नियोजन, चुकीच्या कामांचा फटका
खेड ते आरवली दरम्यानचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र केलेल्या कामात अनेक त्रुटी आढळल्यामुळे झालेले काम तोडून ते पुन्हा नव्याने करण्याची वेळ ठेकेदार कंपनीवर आली. त्यामुळे कोट्यवधी रुपयाचा खर्च वाया गेलाच. त्याशिवाय ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांच्या चुका दुरूस्त करण्यासाठी पुन्हा कोट्यवधी रुपयाचा खर्च करावा लागत आहे. लोटे, चिपळूण शहर, सावर्डे, खेरशेत येथील कामात अनेक प्रकारच्या चुका झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत लोटे येथे आहे. त्यामुळे आवाशी फाट्यावर अंडरपास करण्याची गरज आहे हे स्थानिक सुरवातीपासून सांगत होते. येथून कारखानदारांची मालवाहतूकीची वाहने जातात त्यानाही भविष्यात रस्ता ओलांडताना त्रास होणार हे नागरिक सांगत होते. मात्र ठेकेदार कंपनीने तेथे अंडरपास न करता चारपदरी रस्ता बनवला. रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो ओलांडताना अपघात होऊ लागले. त्यामुळे आवाशी फाट्यावर केलेला चांगला रस्ता खोदून आता तेथे उड्डाण पुल बनविला जात आहे. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने सुमारे ७०० मीटरचा तयार रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी झालेला सुमारे १ कोटीचा खर्च वाया गेला आहे. त्याशिवाय उड्डाण पुल बनविण्यासाठी ३ कोटी ८० लाखाचा खर्च नव्याने केला जात आहे. सुरवातीला रस्ता बनविताना नागरिकांना तसेच कारखानदारांना त्रास सहन करावा लागला. आता नव्याने उड्डाण पुल बनविताना त्रास सहन करावा लागत आहे.
चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दोन वर्षापूर्वी पुलाचे गर्डर उभे करताना अपघात झाला. त्यानंतर पिलरचे डिझाईन बदलण्यात आले. त्यामुळे पूर्वी उभारलेल्या पिलरचा काही भाग तोडून त्याची रचना बदलण्यात आली. तसेच दोन पिलरच्या मध्ये एक पिलर नव्याने बांधण्यात आला. या कामात ठेकेदार कंपनीला सुमारे चार कोटी रुपये खर्च करावे लागले. परशुराम घाटात चक्क दरीच्या बाजूने भराव टाकून रस्ता बनवण्यात आला. हा मातीचा भराव वाहून जाऊ नये म्हणून संरक्षण भिंतही बांधण्यात आली. मात्र पहिल्या पावसाळ्यात ही भिंत वाहून गेली रस्ता खचला त्यामुळे ठेकेदार कंपनीला घाटात काही ठिकाणी रस्ता बंद करावा लागला आहे. घाटातील माती परिक्षण करून आता नव्याने संरक्षण भिंत बांधून रस्ता खचणार नाही यासाठी नव्याने उपायोजना सुरू आहेत. येथे ४० मीटरची एक भिंत बांधण्यासाठी सुमारे ९० लाखाचा खर्च आला होता. नव्याने उपायोजना करण्यासाठी अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. सावर्डे बाजारपेठेत नागरिकांनी उड्डाणपुलाची मागणी केली होती, मात्र येथे उड्डाणपूल न बांधता चारपदरी रस्ता बांधण्यात आला आहे. या रस्त्याला लागून असलेल्या सेवा रस्त्याची उंची कमी आहे. त्याचा त्रास वाहन चालकाना होत आहे. वहाळ फाटा येथे बांधलेला उड्डाण पूल खचला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी कंपनीला पुन्हा खर्च करावा लागला.
-------
आरवली- कांटे- वाकेड टप्प्यांत अपूर्ण काम
रत्नागिरी जिल्ह्यात आरवली-कांटे (३९.२४ किमी) आणि कांटे-वाकेड (४९.१५ किमी) या टप्प्यात अजूनही दोन लेनचे काम पूर्ण झालेले नाही. कशेडी घाटातील बोगदा पूर्ण झाला. तर या बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण होणे बाकी आहेत. या रस्त्यानजीकची गटारांची कामे अर्धवट आहेत. चिपळूण, संगमेश्वर येथील पूल आणि उड्डाणपूलांची कामे प्रगतीपथावर असली तरी ती पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी जाणार आहे. लांजा ते पाली दरम्यान ५० टक्के रस्ता पूर्ण व्हायचा आहे. काजळी पुलाचे काम अपूर्ण आहे. पाली ते लांजा दरम्यान रस्त्याची स्थिती खूप खराब आहे.
------
रखडलेली कामे, दुरुस्तीसाठी आंदोलन
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाची कामे प्रलंबित असल्याने कोकणच्या विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही. मे २०२७ किंवा डिसेंबर २०२७ पर्यंत चौपदरीकरणाची सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई ते सिंधुदुर्ग हा महामार्ग सुसाट होईल अशी डेडलाइन शासनाकडून दिली जात आहे. यानंतरच रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. दरम्यान, पुढील दीड वर्षात कर्नाटक आणि केरळ राज्यातील महामार्ग चौपदरीकरणाचेही काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता असल्याने मुंबई ते कन्याकुमारीपर्यंतचा हा मार्ग कोकणच्या विकासाची नवी जीवनवाहिनी ठरणार आहे.
------
जनआक्रोश समितीचा लढा
गेली बारा वर्षे चौपदरीकरणाचे काम विविध कारणांमुळे रखडले. यात अनेक ठिकाणी चुकीचे डायव्हर्जन, खड्डेमय रस्ते, अपूर्ण असलेली चौपदरीकरणाची कामे यामुळे गेल्या बारा वर्षात अनेक अपघात झाले. या अपघातात अडीच हजार प्रवाशांना जीव गमवावा लागला. त्यामुळे चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत पळस्पे ते लांजा या महामार्ग हद्दीत मुंबई- गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने लढा सुरू ठेवला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-----
वाटूळ येथील रखडलेला सर्व्हीस रोड
राजापूर आणि लांजा तालुक्याच्या हद्दीत महामार्गावर वाटूळ हे महत्वाचे ठिकाण आहे. वाटूळ फाट्यावरून राजापूर येथून भांबेड-दाभोळे मार्गे कोल्हापूर जाता येत असल्याने वाटूळ हे ठिकाण वाहन चालकांच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे. वाटूळ-भांबेड रस्ताही रूंद, दर्जेदार आणि गुळगळीत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून वाटूळ फाट्यावरून भांबेड-दाभोळे मार्गे कोल्हापूर जाणार्या वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. मात्र, वाटूळ फाट्याच्या येथील मुंबईकडून गोव्याकडे जाणार्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम रखडलेल्या स्थितीमध्ये आहे. सर्व्हिस रोडचा काम अर्धवट स्थितीमध्ये असल्याने रस्त्याच्या पलीकडच्या वाहन चालकांना उलट्या दिशेने जात एक तर, पुलावर येवून महामार्गावर यावे लागते किंवा पूलाखालून पलीकडे येत रस्त्यावर यावे लागते. मात्र, गोव्याकडून मुबंईकडे जात असताना त्या बाजूच्या पूलाच्या येथील भाग नागमोड्या वळणांचा असून वाहनांची वर्दळही मोठ्याप्रमाणात असते. अशा स्थितीमध्ये या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे सर्व्हिस रोडचे रखडलेले काम झाल्यास त्या बाजूचा वाहनांचा धोकादायक प्रवास टळणार आहे.
------
चौकट
- rat18p12.jpg-
18545
वाटूळ येथील रखडलेला सर्व्हीस रोड.
वाटूळ येथील रखडलेला सर्व्हीस रोड
राजापूर आणि लांजा तालुक्याच्या हद्दीवरील महामार्गावरील वाटूळ हे महत्वाचे ठिकाण आहे. वाटूळ फाट्यावरून राजापूर येथून भांबेड-दाभोळे मार्गे कोल्हापूर जाता येत असल्याने वाटूळ हे ठिकाण वाहन चालकांच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे. वाटूळ-भांबेड रस्ताही रूंद, दर्जेदार आणि गुळगळीत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून वाटूळ फाट्यावरून भांबेड-दाभोळे मार्गे कोल्हापूर जाणार्या वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. मात्र, वाटूळ फाट्याच्या येथील मुंबईकडून गोव्याकडे जाणार्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम रखडलेल्या स्थितीमध्ये आहे. सर्व्हिस रोडचा काम अर्धवट स्थितीमध्ये असल्याने रस्त्याच्या पलीकडच्या वाहन चालकांना उलट्या दिशेने जात एक तर, पुलावर येवून महामार्गावर यावे लागते किंवा पुलाखालून पलीकडे येत रस्त्यावर यावे लागते. मात्र, गोव्याकडून मुबंईकडे जात असताना त्या बाजूच्या पुलाच्या येथील भाग नागमोड्या वळणांचा असून वाहनांची वर्दळही मोठ्याप्रमाणात असते. अशा स्थितीमध्ये या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे सर्व्हिस रोडचे रखडलेले काम झाल्यास त्या बाजूचा वाहनांचा धोकादायक प्रवास टळणार आहे.
-----
कोट
rat18p15.jpg-
18548
ज्ञानेश्वर रोकडे
चौपदरीकरणाच्या कामात राहिलेल्या त्रुटी पाहिल्या तर नियोजनाचा अभाव दिसून येत असुन क्रॉक्रिंटचा रस्ता पूर्ण झाल्यावर पुन्हा खोदाई करुन निष्कारण जनतेच्या पैशांची अपव्यय सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे.
- ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामस्थ
----
कोट
rat18p14.jpg-
18547
सूरज जोगळे
सार्वजनिक पैशांचा अपव्यय हा दुहेरी खर्च. आधी कोट्यवधी रुपये खर्च करून कॉंक्रिटचा रस्ता बनवणे आणि आता तो फोडण्यासाठी व पुन्हा दुरुस्त करण्यासाठी पुन्हा खर्च करणे हा थेट करदात्यांच्या पैशांचा चुराडा आहे. कॉंक्रिटचा रस्ता फोडल्यानंतर तो पूर्वीसारखा एकसंध राहत नाही, ज्यामुळे रस्त्याच्या आयुर्मानावर परिणाम होतो. याकडे देखील संबंधित विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.
- सूरज जोगळे, सामाजिक कार्यकर्ते
-----
कोट
rat18p13.jpg-
18546
पंकज गोसावी
ओव्हरहेड ब्रिज नसल्याकारणाने अपघात होत आहेत तर काही अरुंद वळणे किंवा महामार्गाचे लगत असलेल्या शाळा या ठिकाणी फूटब्रीज बांधणे ही कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. आवश्यक त्या सर्व सूचना आम्ही संबंधित ठेकेदाराला देत आहोत. त्या अनुषंगाने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे आमचा कल आहे.
- पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग
-----
कोट ४
rat18p20.jpg-
18563
नितीन जाधव
समृद्धी महामार्ग पूर्ण झाला परंतु आपल्या कोकणातला हा महामार्ग गेली पंधरा वर्षे झालेल्या पूर्णत्वाकडे जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. जो रस्ता पूर्ण झालेला आहे, त्या ठिकाणी रस्ता खचतो. संरक्षक भिंतींचा अभाव किंवा धोकादायक वळण काढण्यात आलेली नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोकणातील या केविलवाण्या परिस्थितीला स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यामुळे आता तरी सुज्ञ कोकणकरांनी एकत्र येऊन या प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे.
-नितीन जाधव, सामाजिक कार्यकर्ते
------------
कोट ५
- rat18p21.jpg-
18564
अॅंड. सैफ चौगुले
कोकण हा नेहमीच विकासाच्या दृष्टीने मागासलेला राहिलेला दिसून आलेला आहे. देशाचे मंत्री नितीन गडकरी हे वेळोवेळी महामार्ग पूर्णत्वास जाईल अशा पद्धतीने आजपर्यंत नवनवीन डेडलाईन देत आहेत. परंतु या ठिकाणी असलेले प्रशासन आणि ठेकेदार यांच्या सावळ्या गोंधळामुळे महामार्गाच्या कामाचा पुरता बोजवारा उडालेला दिसून येत आहे. यामुळे जनतेच्या पैशाची केवळ उधळपट्टी सुरू असून संबंधित ठेकेदार आणि स्थानिक अधिकारी यांच्यावर वरिष्ठ प्रशासनाने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
- अॅंड. सैफ चौगुले, विधीतज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

