रत्नागिरी- सुरेख रंग भरत विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

रत्नागिरी- सुरेख रंग भरत विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

Published on

rat1812.txt

बातमी क्र. 12 (पान 2 साठी, मेन)
(टीप- फोटोफिचर वरती घेऊन बातमी खाली घ्यावी.)

सोबत फोटो आहे.
rat18p1.jpg- रत्नागिरी : सकाळ चित्रकला स्पर्धेत रविवारी कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर केंद्रावर गणपती उत्सवाचे चित्र रंगवताना विद्यार्थी.
rat18p2.jpg- रत्नागिरी : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर केंद्रावर विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली.
rat18p3.jpg- रत्नागिरी : स्पर्धेत सुरेख चित्र रंगवताना विद्यार्थिनी.
rat18p6.jpg- रत्नागिरी ः दामले केंद्रावर आलेल्या एका मुलीने चित्र रंगवण्यासाठी मोठा पेटारा आणला होता, त्यातील कोणता रंग वापरू असे तिला झाले होते. तिची ही पेटी लक्षवेधी ठरली.
rat18p८.jpg- दामले केंद्रावर पालिकेचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले.
rat18p९.jpg- एका विद्यार्थ्याने काढलेले गणपती विसर्जनाचे आणि एका मुलीचे काढलेले परसबागेचे सुंदर चित्र लक्षवेधी ठरले.
rat18p१२.jpg- दामले केंद्रावर चित्रकला स्पर्धेत दंग झालेले बालचित्रकार.
rat18p22.jpg- खेड ः येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदूलालशेठ हायस्कूल च्या प्रशालेत सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी
-rat18p23.jpg- दापोली ः येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यामंदिर दापोली केंद्रावरील सुरू झालेली चित्रकला स्पर्धा
-rat18p24.jpg- चिपळूण येथील अलोरे केंद्रावर चित्र काढण्यात मग्न झालेले विद्यार्थी.
----------

सुरेख रंग भरत विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

सकाळ चित्रकला स्पर्धा ; विसर्जन मिरवणूक, परसबाग, रांगोळीत रमले बालदोस्त

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : सकाळ चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी रविवारी विविध विषयांवर चित्र रेखाटून त्यात सुरेख रंग भरून आनंदोत्सव साजरा केला. रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय आणि कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेतील केंद्रावर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन टप्प्यात झालेल्या या चित्रकला परिक्षेत सहभागी शेकडो विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम चित्र रेखाटत त्या सुरेख रंग भरत आनंदोत्सव साजरा केला. बालदोस्तांसोबत आलेल्या पालकांनीही ''सकाळ''च्या या उपक्रमाचे कौतुक केले.
पहिली व दुसरीसाठी माझा स्वेटर व कान टोपी, आमची कार, माझा पाळीव प्राणी, रांगोळी डिझाईन असे विषय दिले होते. इयत्ता तिसरी व चौथीसाठी आमचा पाळीव प्राणी (कुत्रा, मांजर, गाय), माझी खोली, माझी मैत्री, घरातली परसबाग असे विषय होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटासाठी निवडणूक प्रचार फेरी, रस्सीखेच, गणपती विसर्जन मिरवणूक आणि बस स्टॅन्ड तर इयत्ता आठवी ते दहावीसाठी ऐतिहासिक वास्तू पाहायला गेलेली शालेय विद्यार्थ्यांची सहल, घोड्यांची शर्यत, मनोरंजनात एआयचा वापर कसा करता येईल आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणे असे विषय देण्यात आले होते. यातील सर्वच विषय विचारशक्तीला चालना देणारे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती रंगवली. गणपती विसर्जन मिरवणूक, बस स्टॅन्ड, पाळीव प्राणी कुत्रा, माझी खोली आणि रांगोळी डिझाईन या चित्रांना विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
रत्नागिरी शहरातील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात सकाळी स्पर्धा सुरू झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. आगाशे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच क व ड गटातील विद्यार्थ्यांना पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिर या केंद्रावर गेली अनेक वर्षे सकाळ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत असून संस्था व शाळेचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
रत्नागिरीतील दामले विद्यालय येथील केंद्रावर सकाळपासूनच अतिशय उत्साहाचे वातावरण होते. मुख्याध्यापक भगवान मोटे यांच्यासह सौ. अनन्या कीर, प्रमोद म्हमाणे, प्रशांत मांडवकर, प्रियंका ढोकरे, प्रवीण पाचलकर, दिप्तेश पाटील, शिवानी शिवणेकर, मंजिरी लिमये आणि रवींद्र शिंदे आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य करून चित्रकला स्पर्धा यशस्वी केली. मुलांसमवेत आलेल्या पालकांनाही चित्रकलेच्या विषयाबाबत मोठी उत्सुकता होती. यावेळेचे विषयही हटके असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाल्याचे पालकांनी सांगितले. रत्नागिरी पालिकेचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन मुलांचे कौतुक केले.
-----------


-- बातमीदार- मकरंद पटवर्धन... १८.१.२०२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com