चिपळूण-रंगाच्या दुनियेत हरवले बालदोस्त

चिपळूण-रंगाच्या दुनियेत हरवले बालदोस्त

Published on

rat18p27.jpg-
18643
सती चिंचघरी केंद्रावर चित्र रेखाटताना विद्यार्थी.
-rat18p28.jpg-
18644
चिपळूण ः लक्ष्मीबाई बांदल स्कूलमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी.
-------

रंगाच्या दुनियेत हरवले बालदोस्त
सकाळ चित्रकला स्पर्धा ; चिपळुणात तीन केंद्रावर प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः कोवळे ऊन... निसर्गरम्य वातावरण...कागदावर रेखाटलेले अभिव्यक्तीचे फुलपाखरू अन् रंगरेषांच्या दुनियेत हरवून गेलेले विद्यार्थी आज चिपळूण तालुक्यातील विविध शाळांमध्ये पहायला मिळाले. निमित्त होते ‘सकाळ एनआयई’ चित्रकला स्पर्धेचे. तीन पिढ्यांची परंपरा असलेली ‘सकाळ एनआयई’ चित्रकला स्पर्धा चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. या स्पर्धेस आज विद्यार्थी, पालक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी तालुक्यातील तीन केंद्रावर या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवत आपल्या कल्पनेतून रंगरेषांच्या छटा रेखाटल्या.
चिपळूण शहरातील लक्ष्मीबाई मारूतीराव बांदूल हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी आणि अलोरे येथील मोरेश्वर आत्माराव आगवेकर विद्यालय व सी. ए वसंत लाड ज्युनियर कॉलेजमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेसात वाजेपासून विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात गर्दी करण्यास सुरवात केली होती. सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी शाळेच्या गणवेशात स्पर्धेसाठी हजर होते. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणून साडले आणि स्पर्धा होईपर्यंत केंद्राबाहेर मुलांची वाट पाहत राहिले. विद्यार्थ्यांनी आकर्षक रंगसंगती तर कुणी सस्पेन्शियल स्केचिंगद्वारे चित्र रेखाटले आणि केंद्रावर उपस्थित असलेल्या शिक्षकांना आपले चित्र दाखवले.
चिपळूण शहरातील लक्ष्मीबाई मारूतीराव बांदूल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नयना बागुल, शिक्षका सुप्रिया यादव यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. सकाळचे पांडूरंग साळवी या केंद्रावर उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरीचे
मुख्याध्यापक संजय वरेकर, कला शिक्षक तुकाराम पाटील, ग्रंथपाल जयंत पवार ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या केंद्रावर सकाळतर्फे नागेश पाटील उपस्थित होते. अलोरे येथील मोरेश्वर आत्माराव आगवेकर विद्यालय व सी. ए वसंत लाड ज्युनियर कॉलेज येथे मुख्याध्यापक शरद सोळूंखे, कला शिक्षक नेहा कोकजे, तनय कुंभार यांनी स्पर्धा य़शस्वी करण्यासाठी सहकार्य केले. सकाळतर्फे मुझफ्फर खान हे या केंद्रावर उपस्थित होते.
------------
कोट १
सकाळ एनआयई'' चित्रकला स्पर्धेला मोठी परंपरा आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असल्यामुळे सर्वसामान्य मुलांनाही त्यात भाग घेता येतो. त्याद्वारे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. यामुळे तळागाळातील मुलांपर्यंत चित्रकलेची आवड निर्माण होण्यास मदत होते. त्यातूनच भविष्यात होतकरू चित्रकार निर्माण होण्यास निश्चितपणे मदत होईल.
- शरद सोळूंखे, मुख्याध्यापक, अलोरे हायस्कूल
------------
कोट २
''सकाळ''च्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागामध्ये भविष्यातील मोठा चित्रकार निर्माण होऊ शकतो. ''सकाळ''ने विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ दिले आहे.
- संजय वरेकर, मुख्याध्यापक, सती चिंचघरी हायस्कूल
-------------
कोट
शालेय मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून ''सकाळ'' चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. विद्यार्थी या स्पर्धेची वाट पाहात असतात. ''सकाळ''ला धन्यवाद
- नयना बागुल, मुख्याध्यापिका, बांदूल स्कूल, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com