भक्ती उत्सवाची रत्नागिरीत तयारी

भक्ती उत्सवाची रत्नागिरीत तयारी

Published on

‘भक्ती उत्सवा’ची
रत्नागिरीत तयारी
रत्नागिरी : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या दिव्य उपस्थितीत २२ जानेवारी रोजी रत्नागिरीत भव्य ‘भक्ती उत्सव’ रंगणार आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याच्या कामाचा प्रारंभ गुरुवारी मंगलमय वातावरणात ‘गुरुपूजन’ करून करण्यात आला. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हा आध्यात्मिक सोहळा सुरू होईल. या नियोजन बैठकीस मुख्य संयोजिका ॲड. जया सामंत, शिक्षिका सोनिया, विनिता गोखले यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी भव्य रंगमंच आणि आसनव्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, रत्नागिरीत सध्या चैतन्याचे वातावरण आहे.
------
तेली समाजाचे
संपर्क अभियान
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघाच्यावतीने समाजातील घटकांना संघटित करण्यासाठी ‘संपर्क अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मारुती मंदिर परिसरातील सुधाकर सीताराम कर्लेकर यांच्या निवासस्थानी समाज बांधवांची महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर यांनी या संपर्क अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. जिल्हा कार्याध्यक्ष तथा श्री संत संताजी महाराज जगनाडे पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक राऊत यांनी मार्गदर्शन केले. समाजाची संघटना का आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकत त्यांनी पतपेढीची सद्यःस्थिती आणि ‘ओबीसी’ म्हणून समाजाची भविष्यातील भूमिका यावर सविस्तर विवेचन केले. जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी जिल्हा संघाच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला. रत्नागिरीत उभारण्यात येत असलेले ‘तेली समाज भवन’ हे केवळ इमारत नसून ते समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे, असे सांगत त्यांनी या भवनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. या बैठकीला नारायण झगडे, नीलेश कोतवडेकर, सदानंद शेलार, राजन रहाटे सर, सचिन पावसकर, ॲड. प्रसाद कुवेसकर, महेश लांजेकर यांसह कर्लेकरवाडी, पॉवर हाऊस, विश्वनगर आणि थिबा पॅलेस रोड परिसरातील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
----
- rat१८p३५.jpg-
२६O१८६५८
चिपळूण ः तालुक्यातील धामणवणे येथील बांधावरचे संमेलन च्या बोधचिन्हाचे अनावरण करताना स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी आणि सर्व सहकारी.
---------
‘बांधावरचे संमेलन’च्या
बोधचिन्हाचे अनावरण
चिपळूण ः महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अभिनव उपक्रम ठरणाऱ्या ‘बांधावरचे संमेलन’च्या बोधचिन्हाचे अनावरण स्वागताध्यक्ष कवी शशिकांत मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात पार पडलेल्या दुसऱ्या नियोजन बैठकीत हा सोहळा झाला. ८ फेब्रुवारीला धामणवणे येथील श्री विठलाई मंदिर परिसरातील शेतजमिनीच्या बांधावर हे संमेलन सकाळी ९ ते ५.३० या वेळेत रंगणार आहे. ज्येष्ठ ललित लेखक प्रा. सुहास बारटक्के संमेलनाध्यक्षस्थान भूषविणार असून विनोद कुलकर्णी, अरुण म्हात्रे, विजय जोशी (विजो) आणि सुरेश देशपांडे यांसारखे दिग्गज साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. राघव खर्चे यांनी या बोधचिन्हाचे डिझाईन केले असून संकल्पना प्रा. संतोष गोनबरे यांची आहे. या अनोख्या संमेलनासाठी प्रवेश मर्यादित असून रसिकांनी सहभागासाठी वीणा परांजपे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मसाप, कोमसाप आणि साहित्य भारती या आयोजक संस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com