ती चा भवताल

ती चा भवताल
Published on

‘ती’ चा भवताल ----------लोगो
(१३ जानेवारी टुडे ३)

सौंदर्य म्हणजे आत्मविश्वासाने
चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य

सौंदर्य म्हणजे नेमके काय? फक्त गोरी त्वचा, नितळ चेहरा किंवा आकर्षक केस म्हणजेच सौंदर्य का? एखादी निग्रो स्त्री सुद्धा सुंदर असते! पण त्यातील सौंदर्य समजण्याची समोरच्याची दृष्टी असावी लागते. खरे तर सौंदर्यशास्त्र ही केवळ बाह्य रूपापुरती मर्यादित संकल्पना नसून, ती व्यक्तीच्या आत्मविश्वासाशी, आरोग्याशी, व्यक्तिमत्त्वाशी आणि स्वतःबद्दलच्या सकारात्मक जाणिवेशी जोडलेली एक समग्र शास्त्रशाखा आहे. सौंदर्यशास्त्र म्हणजे त्वचा, केस, शरीर, स्वच्छता आणि निगा यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून, व्यक्तीच्या नैसर्गिक सौंदर्यात योग्य पद्धतीने भर घालणे. सौंदर्य ही कोणत्याही एका साच्यात बसणारी गोष्ट नाही. प्रत्येक स्त्री वेगळी आहे, तिची त्वचा, केस, जीवनशैली वेगळी आहे आणि म्हणूनच सौंदर्याची व्याख्याही प्रत्येकासाठी वेगळी असते.

- rat१९p२.jpg-
OP२६O१८७७६
मेधा अविनाश कुळकर्णी, आर्या ब्युटी केअर
-----
सखी, सौंदर्य हा स्त्री जीवनातील एक अविभाज्य घटक आहे किंवा तिचा हक्क आहे असं मला वाटतं आणि ह्याच जिव्हाळ्याच्या विषयी आपण या सदराद्वारे अनेक पैलू उलगडणार आहोत. सौंदर्याची व्याख्या नेमकी काय असते याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही याचे कारण सौंदर्य हे वेळ, काळ, देश, किंवा प्रांत याच्यानुसार बदलत जाते असं माझं स्पष्ट मत आहे. याचे उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वीच्या काळी लांब सडक केस काळेभोर केस, त्यावर एखादा माळलेला छोटासा मोगऱ्याचा गजरा किंवा फुल हे पूर्वीच्या काळातील सौंदर्याचे लक्षण होते. पण, आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लांब सडक केस राखणे हे फारच कठीण गोष्ट आहे, अशा वेळेला छोटासा किंवा शॉर्ट हेअरकट किंवा शॉट पॉनिटेल आपला कम्फर्ट झोन बनून जातो .
आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका पार पाडत असते – कुटुंब, काम, समाज. या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढणे अनेकदा दुर्लक्षित होते. मात्र स्वतःची निगा राखणे म्हणजे दिखावा नसून स्वतःच्या आरोग्याची आणि आत्मसन्मानाची काळजी घेणे आहे. सुंदर दिसण्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्वतःला सुंदर वाटणे, आणि नुसते सुंदर दिसणे नव्हे तर त्या स्त्रीचा आत्मविश्वास उंचावणे .
या क्षेत्राबाबत अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत.
उदा. ‘एकदा पार्लरमध्ये गेले की सतत जावंच लागतं’, ‘एकदा ट्रीटमेंट घेतली की ती आयुष्यभर करावी लागते’ किंवा ‘सौंदर्य उपचार म्हणजे केवळ खर्चिक गोष्ट’. प्रत्यक्षात हे सगळे समज अयोग्य आहेत. योग्य आणि प्रशिक्षित सौंदर्यतज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेली ट्रीटमेंट ही गरजेपुरती, त्वचेच्या प्रकारानुसार आणि जीवनशैलीनुसार असते. कोणतीही ट्रीटमेंट ही बंधन नसून ती एक पर्याय आहे. योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य काळजी घेतली तर सौंदर्य उपचार सुरक्षित, परिणामकारक आणि उपयुक्त ठरतात. सौंदर्यशास्त्राचा खरा उद्देश स्त्रीला कृत्रिम बनवणे नाही, तर तिच्या नैसर्गिक सौंदर्याला उजाळा देणे हा आहे. सौंदर्य म्हणजे फक्त चेहऱ्यावरचा मेकअप नव्हे, तर आत्मविश्वासाने चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य होय. या सदरामधून पुढील लेखांमध्ये आपण त्वचा-केस निगा, आधुनिक उपचार आणि योग्य सल्ल्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. जेणेकरून प्रत्येक स्त्री सजग, सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण राहील.

(लेखिका ब्युटी थेरपिस्ट हेअर ड्रेसर अरोमा थेरेपीस, CIDESCO (zurich)PHD आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com