‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थना प्रेरक
18837
‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थना प्रेरक
दीपक गावडे ः कट्टा सेवांगणतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः धर्माचा खरा अर्थ सांगणारी साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सर्वांनी आचरणात आणण्याची गरज आहे. बॅ. नाथ पै यांनी आपल्या अल्पायुष्यात फार मोठे कार्य केले. त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम बॅ. नाथ पै सेवांगण सातत्याने करीत आहे, याचे कौतुक वाटते. सेवांगणला माझे कायमच सहकार्य राहील, असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक दीपक गावडे यांनी कट्टा (ता. मालवण) येथे केले.
सेवांगण कट्टा येथे बॅ. नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक गावडे, एलन डान्टस, दीपक गावडे, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, अर्चना धुत्रे, श्रीमती डगरे, अर्जुन पेंडूरकर, वीणा म्हाडगुत, श्री. खरात, श्री. मेस्त्री, श्रीधर गोंधळी, शोभा म्हाडगुत, जगदीश नलावडे, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, रिया जांभवडेकर, मंगल पराडकर, दिक्षा आमरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपक भोगटे यांनी प्रास्ताविकात बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे आयोजित विविध स्पर्धांचा आढावा घेतला. सेवांगणच्या १८ प्रकारच्या विविध स्पर्धांत १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील २१० विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण होत आहे. सातत्याने गेली ५१ वर्षे हा उपक्रमसुरू आहे, त्याबद्दल त्यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे आभार मानले. प्रमुख पाहुणे दीपक गावडे हे चार वेळा पुणे महानगरपालिकेत निवडून आले असून निस्पृह, प्रामाणिक व निष्कलंक चारित्र्याचे आहेत, असे सांगून त्यांचे विशेष कौतुक केले. बॅ. नाथ पै उत्कृष्ट संसदपटू म्हणून भारतात प्रसिद्ध होते. सेवांगण त्यांचे विचार जपून ठेवण्याचे काम सातत्याने करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. किशोर शिरोडकर यांनी बॅ. नाथ पै यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. रिया जांभवडेकर यानी सूत्रसंचालन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

