मॅरेथॉनवर आदिवासी मुलांची मोहोर
18861
मॅरेथॉनवर आदिवासी मुलांची मोहोर
‘जागृती’ अंतर्गत उपक्रम; नाग्या महादू वसतिगृहाला चॅम्पियनशिप
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १९ ः जागृती महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील मुलांनी चॅम्पियनशिप प्राप्त केली. खुल्या गटात आचरा येथील मेधा सातपुते व उभादांडा येथील विराज भुते यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेचे उद्घाटन शेखर सामंत आणि नाग्या महादू आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे संचालक उदय आईर यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक जयराम वायंगणकर, संजीवनी चव्हाण, शेखर साळगावकर, चारुदत्त शेणई, अर्चना गावडे, जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, सचिव अमोल सावंत, क्रीडा प्रमुख प्रशांत मालवणकर, सांकृतिक प्रमुख विवेक राणे, स्पर्धा प्रमुख ऐश्वर्या मालवणकर, चैताली पवार, ईशा मालवणकर, प्रतीक मालवणकर, नवनाथ सातार्डेकर, रवी पांगम, अमृत काणेकर, विनायक वारंग, योगेश वारंग आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील गटवार प्रथम सहा क्रमांक असे ः बालवाडी मुली-सिद्धी धुरी (ज्ञानदा शिशुवाटिका मठ), अमायरा गुडुळकर (उभादांडा), परिधी पालकर (वेंगुर्ले), मनस्वी पालकर (वेंगुर्ले), नित्या गावडे (ज्ञानदा शिशुवाटिका मठ), मुलगे-हर्ष देऊलकर (सरस्वती शिशुवाटिका वेंगुर्ले), सत्यम प्रजापती (शिवाजी प्राग.), राजवीर वायंगणकर (मदर तेरेसा स्कूल), प्रीतेश मुकाडे (शिवाजी प्राग.), बाबुराव बरगाडे (तुळस). पहिली ते दुसरी मुली-अनू निकम, गार्गी निकम (नाग्या महादू आदिवासी वसतिगृह), नैतिका नांदोसकर (खानोली), सिया चव्हाण (परबवाडा), पुनर्वी दळवी (शिवाजी प्राग.), मुलगे-अक्षय पवार (नाग्या महादू वसतिगृह), शिवम जगताप (शिवाजी प्राग.), कनेश कडगांवकर (मदर तेरेसा स्कूल), मैतक शाह (शिवाजी प्राग.), समर्थ बरगाडे (तुळस), सरोज पवार (नाग्या महादू वसतिगृह). तिसरी ते चौथी मुली-अनिता पवार, सुजांग पवार, उर्मिला पवार (नाग्या महादू आदिवासी वसतिगृह), सुमव्या बागवान (वेंगुर्ले क्र.१), इशिता रांजणकर (खानोली क्र.१), स्पृहा नार्वेकर (मदर तेरेसा स्कूल), मुलगे -प्रिन्स पासवान (शिवाजी प्राग.), रुद्र पवार (नाग्या महादू आदिवासी वसतिगृह), अस्मित गिरप (वेंगुर्ले क्र.१), सूरज निकम, मंजुनाव दोडमानी (शिवाजी प्राग.), सागर पवार (नाग्या महादू वसतिगृह). पाचवी ते सातवी मुली-दिव्या मालवणकर (वेंगुर्ले हायस्कूल), सानिका पवार (नाग्या महादू वसतिगृह), अनन्या कुंभार (पाट हायस्कूल), गार्गी परब (परबवाडा क्र.१), अक्षया निकम, पायल पवार (नाग्या महादू वसतिगृह), मुलगे-सूरज पवार, राहूल निकम, सूरज पवार (नाग्या महादू वसतिगृह), युनिश अहमद (वेंगुर्ले हायस्कूल), गुड्डू पासवान (वेंगुर्ले हायस्कूल), अभी पेडणेकर (जनता विद्यालय तळवडे). आठवी ते दहावी मुली-मनीष पवार (नाग्या महादू वसतिगृह), विधी परब (वेंगुर्ले हायस्कूल), सुवर्णा वाघमारे, तनिष्का निकम (नाग्या महादू वसतिगृह), आकांक्षा कुंभार (पाट हायस्कूल). मुलगे-आशीर्वाद सातपुते (आचरा), जितेश निकम (नाग्या महादू वसतिगृह), गुरुनाथ मांजरेकर (जनता विद्यालय तळवडे), भावेश यादव (डॉन बॉस्को ओरोस), रोहित निकम, सागर निकम (नाग्या महादू वसतिगृह).
खुला गट महिला-मेधा सातपुते (आचरा), रेश्मा पांढरे, तृप्ती माडये, दिक्षा (मालवण), रुचिका केरकर (आसोली), नेहा बागकर (आरवली), पुरुष-विराज भुते (उभादांडा), जयेश सावंत (भडगांव), विश्वजित देवळेकर (देवगड), प्रज्वल शिंदे (मालवण), शंकर ठाकूर, शंकर परब (कुडाळ). बक्षीस वितरण नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, गौरी मराठे, गौरी माईणकर, पत्रकार शेखर सामंत, जागृती मंडळाचे अध्यक्ष मालवणकर, नवनाथ सातार्डेकर, योगेश वारंग, सुनील चव्हाण, संजीवनी चव्हाण, अर्चना गावडे, पिंटू कुडपकर, शेखर साळगावकर, अरविंद चव्हाण, चारू शेणई, प्रशांत मालवणकर, अमोल सावंत, विवेक राणे, महेंद्र घाडी आदींच्या उपस्थितीत झाले. निवृत्त क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

