ठाकरे सेनेचे उमेदवार जाहीर
रत्नागिरीत ठाकरे सेनेचे उमेदवार जाहीर
रत्नागिरी, ता. १९ : शिवसेनेपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवेसनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला.
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उबाठाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण, संगमेश्वर येथे बैठका घेऊन रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व संभाव्य उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, युवक संघटक प्रसाद सावंत, महिला तालुका संघटक ममता जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद गटांमध्ये वाटद गटामधून संज्योत सुरेश चव्हाण, खालगाव गटातून विनोद शितप, कोतवडे गटामधून ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सभापती उत्तम मोरे, झाडगाव म्यु. बाहेर आस्था अमित धांगडे, नाचणेमधून शशिकांत बारगोडे, कर्लामधून विलास भातडे, गोळपमधून विनोद शिंदे, तर पावसमधून माजी जिल्हा परिषद सदस्य व विभागप्रमुख रविकिरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हातखंबा गटामधील उमेदवार लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही श्री. राऊत यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यातील पंचायत समिती गणासाठी वाटदमधून प्रणाली प्रकाश मालप, कळझोंडीमधून दीक्षा संतोष हळदणकर, खालगावमधून स्वाती वैभव गावडे, करबुडेमधून सुरेश कारकर, नेवरेमधून दिव्यता दत्तात्रय आग्रे, कोतवडेमधून हरिश्चंद्र धावडे, साखरतरमधून आदेश शशिकांत भाटकर, झाडगाव म्यु. बाहेरमधून सुगरा शहानवाझ काझी, केळ्येमधून गौरव सूर्यकांत नाखरेकर, कुवारबावमधून उमेश राऊत, नाचणेतून विजयकुमार ढेपसे, हरचिरीमधून दत्तात्रय गांगण, भाट्येतून किरण रवींद्र नाईक, गोळपमध्ये अविनाश गुरव, पावसमधून सुभाष पावसकर, गावखडीतून कृषा किसन पाटील, तर कर्लामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नसिमा डोंगरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या सर्वांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
चौकट
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, वंचितशी आघाडी
रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, वंचितशी आघाडी केली जाणार असून, मनसेलाही जागा सोडल्या जाणार आहेत. संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

