

- rat२०p२.jpg-
P२६O१८९५९
राजापूर ः शीळ येथे वारकरी सम्प्रदाय मंडळाच्यावतीने आमदार किरण सामंत यांचा सत्कार करताना रवींद्र नागरेकर. या वेळी उपस्थित आमदार नीलेश राणे आणि मान्यवर.
----
शीळमध्ये हरिनामाचा गजर
सम्प्रदाय मंडळाचा पुढाकार; आमदारांची सदिच्छा भेट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः शहरानजीकच्या मौजे शीळ येथे वारकरी सम्प्रदाय मंडळाच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत आणि कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी वारकरी सम्प्रदाय मंडळाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या आध्यात्मिक प्रसाराच्या कामाचे विशेष कौतुक केले.
शीळ येथील भेटीप्रसंगी राजापूर तालुका वारकरी सम्प्रदाय मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजू कुरूप, शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, दीपक बेंद्रे, अॅड. यशवंत कावतकर, अरविंद लांजेकर, योगेश नकाशे, लांजाचे प्रसन्न शेटये आदींसह मोठ्या संख्येने वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. शहराजवळील शीळ येथे राजापूर तालुका वारकरी सम्प्रदाय मंडळाचे अध्यक्ष आणि शीळ गावचे सुपुत्र रवींद्र नागरेकर यांच्या पुढाकाराने सलग पाचव्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर हरिपाठ, विश्वनाथ उर्फ भाई महाराज गोसावी यांचे प्रवचन, सायंकाळी सोनुबुवा कुर्णेकर पायी दिंडी संस्था भांबेड यांचा हरिपाठ तर हर्चे (ता. लांजा) येथील युवा कीर्तनकार डॉ. मनोहर गोरे यांचे कीर्तन झाले. या सप्ताहाला आमदार सामंत आणि आणि राणे यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार सामंत आणि आमदार राणे यांचा मौजे शीळ वारकरी सम्प्रदाय मंडळाच्यावतीने राजापूर तालुका वारकरी सम्प्रदाय मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.