गुरव समाजाची एकजूट अशीच अभेद्य ठेवा

गुरव समाजाची एकजूट अशीच अभेद्य ठेवा

Published on

- rat२०p४.jpg-
P२६O१८९६१
चिपळूण - चिपळूण तालुका गुरव समाजाच्या २७व्या स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम.
----
गुरव समाजाची एकजूट प्रेरणादायी
आमदार शेखर निकम ः पिंपळी येथे २७वे स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : चिपळूण तालुक्यातील गुरव समाजाची एकजूट जगाने प्रेरणा घ्यावी अशीच आहे. हा समाज संख्येने जरी कमी असला तरी ठायी ठायी या समाजाचे अस्तित्व ठळकपणे दिसून येते. हिंदू धर्मामध्ये देवाच्या सर्वात जवळ असलेल्या या समाजाने आपली एकजूट अशीच अभेद्य ठेवा, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
तालुक्यातील पिंपळी येथे चिपळूण तालुका गुरव समाजाच्या २७व्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते. ते म्हणाले, मुळात गुरव समाज हा अत्यंत संवेदनशील आणि धार्मिक प्रवृत्तीचा असतो. तालुक्यातील गुरव समाज जरी संख्येने कमी असला तरी पिंपळीसारख्या मोक्याच्या ठिकाणी हा समाज स्वतःची जमीन घेतो आणि आपल्या अस्तित्वाची चुणूक आम्हा मंडळींना घ्यावयास भाग पडतो, हे खूप कौतुकास्पद आहे. ज्यांनी कोणी ही जमीन गुरव समाजास दिली आहे त्यांचे खूप मोठे उपकार या समाजावर आहेत आणि गुरव समाजातील ज्या महान कार्यकर्त्यांनी एकीचे हे बीज पेरले त्यांनाही मनापासून दंडवत करतो. आमदार म्हणून माझ्या कक्षेत जे जे जमेल किंवा नाही जमणार तरी देखील या समाजाच्या सर्वतोपरी विकासासाठी प्रयत्न करेन.
या प्रसंगी कोळकेवाडी गावचे गुरव समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत कदम यांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष तुकाराम गुरव (गुरूजी), उपाध्यक्ष प्रकाश पवार, सचिव लवू बडदे, रमेश राणे, सुनील पवार, विलास सकपाळ आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com