कुणबी पतपेढी सहकारी चळवळीचा अभिमान
- rat२०p८.jpg-
२६O१८९६५
राजापूर ः राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या पाचल शाखेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यामध्ये पतपेढीच्या योजनांचे उद्घाटन करताना महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अध्यक्ष प्रकाश मांडवकर आणि मान्यवर.
---
कुणबी पतपेढी हे सहकार चळवळीचे अभिमान
काका कोयटे ः मोबाईल बँकिंग, क्युआर कोड प्रणालीचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः राजापूर तालुका कुणबी पतपेढीने आपले आर्थिक व्यवहार करताना नेहमीच आदर्शाचे प्रमाण राखून पारदर्शकता जपली आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला विश्वासाचा ठसा पाहता ही संस्था महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा खऱ्या अर्थाने अभिमान आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी काढले.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या पाचल शाखेचा रौप्य महोत्सव सोहळा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच दिमाखात पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून कोयटे उपस्थित होते. या महोत्सवाचे औचित्य साधून पतपेढीने आपल्या आधुनिक सेवांचा विस्तार केला आहे. यामध्ये कोयटे यांच्या हस्ते मोबाईल बँकिंग सेवेचे उद्घाटन झाले तसेच सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक बाळ परब यांच्या हस्ते क्युआर कोडप्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. माई हातणकर यांच्या हस्ते वेबसाइटचे उद्घाटन झाले. संस्थाध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या हस्ते सुधन गोल्ड योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
व्यासपीठावर लांजा कुणबी विकास पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, कुणबी मंडळ पाचलचे अध्यक्ष सुरेश बावकर, सचिव सुहास पराडकर, जिल्हा उपनिबंधक बाळ परब, पालक संचालक सुरेश ऐनारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव यांच्यासह संस्थेचे आजी-माजी संचालक व सभासद उपस्थित होते. जितेंद्र पाटकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले
----
चौकट
२०० सभासदांचा विशेष सन्मान
पाचल शाखेच्या २५ वर्षांच्या प्रवासात मोलाचे योगदान देणाऱ्या २००हून अधिक सभासदांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला तसेच, भारतीय लष्करात भरती झालेले शाखा पाचलचे दक्षता कमिटी सदस्य महादेव शिंदे यांचा मुलगा हरिओम शिंदे आणि राधिका मोरे यांचा नातू अक्षय मोरे यांचाही संस्थेच्यावतीने गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

