देवगडात ३१ ला व्यापारी एकता मेळावा
swt202.jpg
18981
देवगड ः येथे व्यापारी महासंघाच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करताना प्रसाद पारकर, नितीन वाळके व इतर. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
swt203.jpg
18982
राजाराम कदम, विजय कदम, प्रसाद गावडे, प्रसन्ना गोगटे
देवगडात ३१ ला व्यापारी एकता मेळावा
पुरस्कार प्रदान सोहळाः खासदार राणे, पालकमंत्री, मान्यवरांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः देवगड तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्ताने विविध पुरस्कारांची घोषणा आज येथे करण्यात आली. येथे ३१ जानेवारीला होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना देण्यात आली. यावेळी निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यंदा ३१ जानेवारीला येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्याचे आयोजन केले आहे. याबरोबरच स्थानिक पर्यटन वाढीसाठी मेळाव्याच्या दिवशी सायंकाळी तसेच १ फेब्रुवारीला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती येथे पत्रकारांना देण्यात आली.
यावेळी व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, तालुकाध्यक्ष शैलेश कदम, तालुका महिला व्यापारी संघ अध्यक्षा प्रियांका साळसकर, व्यापारी पर्यटन समिती अध्यक्ष प्रमोद नलावडे, मिलिंद मोहिते, लारा मयेकर, दयाळ गावकर आदी उपस्थित होते. व्यापारी एकता मेळावा ३१ ला सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कामर्सचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक रामभाऊ भोगले, उद्योजक महेश चव्हाण प्रमुख वक्ते आहेत. यावेळी स्वतंत्र समितीने निवड केलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. आदर्श कार्यकर्ता आणि आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार लवकरच घोषित करण्यात येणार आहेत. मेळाव्याला जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मेळाव्याच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता व्यापारी पर्यटन समितीचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या हस्ते ‘फिश फूड अँड फेस्टिव्हल’ चे उद्घाटन, ७.३० वाजता हिंदी, मराठी गाण्यांसह नृत्याचा समावेश असलेला ऑर्केस्ट्रा ‘सुहानी यादे’, रात्री रंगी रंगला महाराष्ट्र हा कार्यक्रम होणार आहे.
चौकट
जाहीर केलेले पुरस्कार असे...
जीवन गौरव पुरस्कार - ज्येष्ठ व्यापारी राजाराम कदम (देवगड), युवा उद्योजक पुरस्कार - विजय तथा बंटी कदम (देवगड), विशेष उपक्रमशील पर्यटन व्यावसायिक पुरस्कार - प्रसाद गावडे (दोडामार्ग), आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार - सुषमा देसाई (देवगड), आदर्श व्यापारी शेतकरी पुरस्कार - प्रसन्ना गोगटे (जामसंडे), आदर्श पर्यटन उद्योजक पुरस्कार - वैष्णवी जोईल (देवगड), आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार - उमेश नेरुरकर (मालवण).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

