शस्त्रजमा आदेशांचा पुनर्विचार करा
18983
वसंत केसरकर
शस्त्रजमा आदेशांचा पुनर्विचार करा
वसंत केसरकर ः वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः निवडणुकीच्या काळात परवानाधारक बंदुका जमा करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने परवानाधारकांची योग्य पडताळणी करून शेती संरक्षणासाठीच्या बंदुका शेतकऱ्यांकडेच ठेवाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केली आहे.
सध्या ग्रामीण भागात हत्ती, गवे आणि इतर वन्यप्राण्यांची दहशत सुरू आहे. बंदुकीच्या आवाजामुळे हे प्राणी पळवून लावता येतात; मात्र शस्त्र जमा केल्यामुळे शेतीचे रक्षण करणे कठीण झाले आहे. नगरपरिषद निवडणुकीनंतर आता पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंदुका जमा करण्याचे आदेश दिले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पोलिस ठाण्यात येण्या-जाण्यासाठी नाहक खर्च आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. ज्या परवानाधारकांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, त्यांच्या बंदुका सरसकट जमा करणे अयोग्य आहे. प्रशासनाने गैरवापर होणार नाही, याची खात्री करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. गेल्या आठ वर्षांपासून नवीन शेती संरक्षण परवाने मिळालेले नाहीत. तसेच सुमारे १२०० मृत परवानाधारकांच्या वारसांचे नूतनीकरणाचे अर्ज प्रशासनाकडे धूळखात पडून आहेत.
लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी!
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांनी बंदूक जमा करताना पोलिस ठाण्यात पडताळणी करून पुन्हा ती घरी नेण्यासाठी प्रयत्न करावेत. शेती संरक्षणासाठी असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होत नसेल, तर प्रशासन ती जमा का करून घेत आहे?, असा प्रश्नही केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला.
चौकट
केसरकरांचे काही महत्त्वाचे मुद्दे
- निवडणूक काळात परवानाधारक बंदुका जमा करण्याच्या निर्णयाने बागायतदारांचे नुकसान
- शेती संरक्षणासाठीच्या बंदुका शेतकऱ्यांकडेच ठेवा
- ग्रामीण भागात हत्ती, गवे व अन्य वन्यप्राण्यांची वाढती दहशत
- बंदुकीच्या आवाजामुळे वन्यप्राणी पळवता येतात
- पोलिस ठाण्यात वारंवार ये-जा मुळे नाहक खर्च
- गुन्हेगारी रेकॉर्ड नसतानाही बंदुका सरसकट जमा करणे अयोग्य
- गैरवापर होणार नाही याची खात्री करून शेतकऱ्यांना दिलासा द्या
- आठ वर्षांपासून नवीन शेती संरक्षण परवाने दिलेच नाहीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

