शेनाळे शाळेत पैठणी खेळाचा रंगतदार सोहळा
rat२०p१७.jpg
२६O१८९७६
शेनाळे: रंगतदार पैठणी खेळात सहभागी झालेल्या शेनाळे गावातील महिला.
शेनाळे शाळेत रंगला पैठणीचा खेळ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २० ः आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, शेनाळे येथे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. या वेळी पैठणीचा खेळ रंगतदार झाला. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सुनील आईनकर यांनी केले होते. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या.
या वेळी माजी सरपंच विश्वनाथ सावंत यांच्या सौजन्याने महिलांसाठी ‘साथ नशिबाची पैठणी कुणाची’ हा लोकप्रिय खेळ आयोजित करण्यात आला. या खेळामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. खेळांमध्ये सहभागी महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. अंतिम फेरीत शेनाळे गावातील सानिका धोंडगे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा विनिता गायकवाड यांच्या हस्ते त्यांना पैठणी देऊन गौरवण्यात आले. तसेच कविता जगताप यांनी द्वितीय तर रविना पेंढारी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

