मनशक्ती केंद्रातर्फे यश-शांतीसाठी न्यू वे उपक्रम

मनशक्ती केंद्रातर्फे यश-शांतीसाठी न्यू वे उपक्रम

Published on

यश-शांतीसाठी ‘न्यू वे उपक्रम’
मधूर चंदने ः मनशक्तीतर्फे रत्नागिरीत आज आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः मनशक्ती केंद्र लोणावळा या सामाजिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मनःशक्ती केंद्रातर्फे यश-शांतीसाठी न्यू वे हा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित केला आहे. हा कार्यक्रम उद्यापासून (ता. २१) सुरू होत आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्र होणार आहेत, असे केंद्राचे जीवनदायी साधक मधूर चंदने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी मनःशक्ती केंद्र लोणावळ्याचे जीवनदायी साधक राजांना नाईक, डॉ. विवेक इनामदार, विलास सनगरे, सतीश पालकर आदी उपस्थित होते. चंदने म्हणाले, सध्या परीक्षांचा काळ आहे. येणाऱ्या परीक्षेला ताणमुक्त मनाने कसे सामोरे जायचे यासाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या सोप्या युक्त्या या विषयावरील मार्गदर्शन २१ जानेवारीला सकाळी साडेआठ ते १० या वेळेत तर युवकांसाठी दिशा, ध्येयपूर्तीची हा उपक्रम २२ ला सकाळी ८.३० ते १० या कालावधीत होईल. २१ला दुपारी १० ते १२ या वेळात गर्भसंस्कार या विषयावर मार्गदर्शन आहे. कुटुंबातील ताण कमी व्हावा, सुख-शांती वाढावी यासाठी मनःशांती, ताणमुक्ती आणि ध्यान या विषयावर दुपारी १२.३० ते २ या वेळेत सत्र होईल. मत्सरघात परिणाम व उपाय हे सत्र २१ला सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत होईल. दोन्ही दिवशी पालक, बालवाडी शिक्षक, अंगणवाडी सेविका व अन्य लोकांसाठी मुलांना घडवताना या विषयावर मार्गदर्शन २.३० ते ४ या वेळेत तर २२ला सकाळी १० ते १२ या वेळेत होईल. ८ ते २१ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी पालकत्वाची दिशा या विषयावर दोन्ही दिवशी सायंकाळी ४.३० ते ६ या वेळात सत्र होईल. २२ला दुपारी १२.३० ते २ या काळात आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग या विषयावर मार्गदर्शनपर सत्र होईल. या उपक्रमाचे उद्‍घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते उद्या (ता. २१) सकाळी १० वा. होईल.

चौकट
विद्यार्थ्यांसाठी माईंड जिम उपक्रम
मुलांच्या भावी आयुष्यात उजव्या मेंदूचे स्थानही महत्त्वाचे असते, असे लक्षात आले आहे. त्या दृष्टीनेच रत्नागिरीतील या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी खास माईंड जिम या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत विविध सत्रे आयोजित केली आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com