राजापूर -सोलगाव शाळेत उभारताहेत ''औषधी वनस्पती उद्यान''

राजापूर -सोलगाव शाळेत उभारताहेत ''औषधी वनस्पती उद्यान''

Published on

rat20p24.jpg
18998
राजापूरः औषधी वनस्पती उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, सुभाष नवाळे, अक्षय कशेळकर, राजेंद्र बाईत, प्राची कोळवणकर, एकता बाणे, वेदिका तरळ, दिनेश चौगुले, उमेश गमरे, अरविंद जाधव, अमृता चौगुले, प्रसाद म्हाडदळकर आदी.

काही सुखद-------लोगो

सोलगाव शाळेत ''औषधी वनस्पती उद्यान''

उपयुक्त वनस्पतींची लागवड ; नव्या पिढीला वनौषधींची ओळख

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध आजारांवरील उपचारपद्धती विकसित झालेल्या आहेत; मात्र औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे उपचारपद्धतींमधील महत्व कमी झालेले नाही. जंगलतोडीसह अन्य विविध कारणांमुळे पवर्तरांगा अन् जंगल परिसरातील औषधी वनस्पती कमी होत आहेत. अशा औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी आणि त्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने सोलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘औषधी वनस्पती उद्यान’ विकसित केले आहे. त्यात विविध आजारांवर उपयुक्त औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.
सह्याद्री शिक्षणसंस्थेचे संस्थापक आणि शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून प्रशालेत उभारलेल्या औषधी वनस्पती उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक चौगुले यांनी औषधी वनस्पतींचे जतन अन् संवर्धन व्हावे, पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासल्या जाणार्‍या वनौषधींची नव्या पिढीला माहिती व्हावी, या उद्देशाने औषधी वनस्पती उद्यान विकसित करण्यात आल्याचे सांगितले. उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नवाळे, अक्षय कशेळकर, राजेंद्र बाईत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राची कोळवणकर, ग्रामपंचायत सदस्य एकता बाणे, वेदीका तरळ, प्रशाळेचे मुख्याध्यापक दिनेश चौगुले आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

----

चौकट
उद्यानात लागवड केलेली झाडे
सुरंगी, सागरगोटा, सर्पगंधा, मेहंदी, मुरूडशेंग, गुळवेल, गोकर्ण, गुडमार, पुत्रजीवा, टेंबुर्णी, शिकेकाई, वाळा, अक्कलकाढा, कडुलिंब, काळी निर्गुंडी, कडू कवट, गुंज, हाडसांधी, दर्भ, रक्तचंदन, चंदन, नागकेशर, सीताअशोक, कोरफड, काळमेध, अग्नीमंथ, मंडुपकर्णी, नरक्या, लालचित्रक, सुबाभुळ या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.
-----

कोट १
कोकणभूमी वनसंपदा आणि विविध वनौषधींनी नटलेली आहे. या वनौषधींचे जतन आणि संवर्धन व्हावे, वनौषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या उद्देशाने औषधी वनस्पती उद्यान उपक्रम राबवलेला आहे. यासाठी प्रशालेतील १०वीच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभलेले आहे. त्यासाठी मुख्याध्यापक दिनेश चौगुले आणि सहकारी शिक्षक यांचे कौतुक आहे.
- डॉ. राजाराम राठोड, प्राचार्य, आबासाहेब मराठे महाविद्यालय

Marathi News Esakal
www.esakal.com