कोकण
सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान
19029
सिंधुदुर्ग किल्ल्यावर
स्वच्छता अभियान
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २० ः गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेची सुरुवात जरीमरी माता मंदिर येथे पूजा करून करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्यातील राजवाडा परिसरात वाढलेली झाडे झुडपे काढण्यात आली. तसेच सभामंडप, दहिबाव, महादरवाजा, आजूबाजूचा परिसर स्वछ करण्यात आला. या मोहिमेचे आयोजन संपर्क प्रमुख विकास तोरसकर, अभिजित तिरलोटकर यांनी केले. या स्वच्छता मोहिमेमध्ये अनिरुद्ध तिर्लोटकर, अविनाश मोरे, प्रशांत गुरव, अभिषेक गूरव, शैलेश तिर्लोटकर, प्रथमेश कोळसुमकर, रोहित गुरव, सुमित येझरकर, हृषिकेश सावंत, रोहित अडकर आदी १५ दुर्गसेवकांनी सहभाग घेतला. या मोहिमेला सयाजी सकपाळ यांचे सहकार्य लाभले.

