

कासार्डेत आजपासून
वर्धापन दिन सोहळा
तळेरे, ता. २० : कासार्डे बंडवाडी येथील गणेश मंदिरात श्री गणेश जयंती उत्सव व चौथा वर्धापन दिन सोहळा उद्यापासून (ता. २१) सुरू होत आहे. उद्या (ता. २१) सकाळी ८ वाजता चौथा वर्धापन दिन सोहळा, श्री गणेशयाग, दुपारी १२ वाजता ग्रंथवाचन, ग्रंथसमाप्ती, आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता पालखी प्रदक्षिणा, ७ वाजता रासगरबा, रात्री ९ वाजता माऊली वारकरी सांप्रदाय भजन मंडळ शिडवणे यांचे दिंडी भजन, गुरुवारी (ता. २२) सकाळी ८ वाजता श्रींची महापूजा, एकादशमी व अभिषेक, दुपारी १२ वाजता जन्मसोहळा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता जीवनविद्या मिशनतर्फे ‘संकल्पसिद्धीचे गुपित विश्वप्रार्थना’ यावर अशोक नाईक यांचे प्रवचन व कीर्तन, सायंकाळी ५ वाजता विविध स्पर्धा, ७ वाजता प्रदक्षिणा व आरती, रासगरबा, रात्री ८ वाजता मालवीर भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, मुटाट यांचे भजन, १० वाजता विनोदी दोन अंकी नाटक ‘भटाची बायपास’, शुक्रवारी (ता. २३) दुपारी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ३ हळदीकुंकू, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, सायंकाळी ६.३० वाजता प्रदक्षिणा व आरती, रासगरबा, रात्री ८ वाजता आनंद बुवा संघ मुंबई (बुवा नंदादीप वंजारे) यांचे सुस्वर भजन, रात्री १० वाजता श्री गणेशकृपा बंडवाडी आयोजित ‘सांस्कृतिक धमाका’ कार्यक्रम होणार आहे.