बारसू, कशेळी, पूर्णगडचा अभ्यास दौरा

बारसू, कशेळी, पूर्णगडचा अभ्यास दौरा

Published on

-rat२०p२२.jpg-
२६O१८९९४
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलच्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी बारसू येथील कातळशिल्पांना भेट दिली.
---
बारसू, कशेळी, पूर्णगडचा अभ्यासदौरा
पटवर्धन हायस्कूल; कातळशिल्प, इतिहासाचे घेतले धडे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : पुस्तकातील इतिहास प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहिला की, तो मनावर कायमचा कोरला जातो. याचाच प्रत्यय रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आला. देवाचे गोठणे व बारसू येथील सड्यावर कोरलेली हजारो वर्षांपूर्वीची कातळशिल्पे पाहून विद्यार्थी थक्क झाले. शाळेतर्फे सातवीच्या एकदिवसीय अभ्यास सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी बारसू व देवाचे गोठणे येथील रहस्यमय कातळशिल्पे, प्राचीन सूर्यमंदिर आणि निसर्ग संवर्धनाचा थरार अनुभवला.
कातळशिल्प संशोधक मार्गदर्शक ऋत्विज आपटे व राधेय पंडित यांनी या शिल्पांमागील आदिमानवाचा इतिहास, प्राण्यांच्या आकृती आणि त्यांचे जागतिक महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. निसर्गयात्री संस्थेचे कातळशिल्प संशोधक सुधीर रिसबूड, तार्किक खातू यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक वारशाचे सखोल दर्शन घडले.
मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक कल्पना शिरोळकर, अमर लवंदे आणि सहलप्रमुख जयेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे नियोजन केले. कौस्तुभ पालकर, संकेत पाडाळकर, मीना टापरे, माधवी तेंडुलकर, अक्षता मोहिते आणि अक्षया भाटकर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com