रक्तदानातून समाजसेवेची संधी
swt218.jpg
19233
ओटवणे ः येथे आयोजित रक्तदान शिबिरात उपस्थित मान्यवर व रक्तदाते.
रक्तदानातून समाजसेवेची संधी
दयानंद गवसः ओटवणेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २१ः रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारासह अपघातप्रसंगी त्या व्यक्तीला रक्ताची गरज भासली तर वेळीच रक्तपुरवठा करून त्याचा प्राण वाचवू शकतो. विज्ञानाने अनेक शोध लावले; मात्र रक्त निर्माण करू शकत नाही. रक्त हे दुसऱ्या व्यक्तीकडूनच घ्यावे लागते. त्यामुळे ऑन कॉल रक्तदाते संस्था गावागावांतील सेवाभावी संस्थेच्यावतीने आतापर्यंत रक्तदानाचे महान कार्य करीत असून या रक्तदान चळवळीला रक्तदात्यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त विभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी केले.
येथील गावप्रमुख (कै.) बाबली उर्फ दादा गावकर यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त ऑन कॉल रक्तदाता संघटना आणि ओटवणे ग्रामस्थ यांच्यावतीने ओटवणे कुळघर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. गवस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, गोवा येथील ज्ञानेश्वर कविटकर, गावप्रमुख रवींद्रनाथ गावकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सगुण गावकर, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, पोलिसपाटील शेखर गावकर, सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. नीलेश अटक, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, अनिल खाडे, अमेय गावडे, ज्ञानेश्वर गावकर, परशुराम नाईक, गुरू बुराण, पपलू गावकर आदी उपस्थित होते.
बाबली गवंडे यांनी संस्थेने जिल्हा, राज्य आणि राज्याबाहेरही रक्तदान क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. रवींद्र म्हापसेकर यांनी (कै.) बाबली उर्फ दादा गावकर यांच्या स्मृतींना उजाळा देत रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले. ज्ञानेश्वर कविटकर यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात मंगेश चिले या ए-निगेटिव्ह दुर्मीळ रक्तदात्यासह आनंद भैरवकर, बाबली उर्फ बाळू गावकर, ओंकार गावकर, वैभव राणे, किशोर झोळंबेकर, कृष्णा बुराण, विजय म्हापसेकर, प्रशांत बुराण, समित बुराण, प्रसाद कविटकर, कन्हैय्या मयेकर, विनायक मेस्त्री, दादा गावकर, जयगणेश गावकर, विनायक वर्णेकर, अमोल परब, आशिष भानसे आदी युवकांनी रक्तदान केले. सूत्रसंचालन जयगणेश गांवकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

