फणसगाव महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासाचे धडे
swt2116.jpg
19280
फणसगावः व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
फणसगाव महाविद्यालयात
व्यक्तिमत्व विकासाचे धडे
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव आयोजित अंतर्गत गुणवत्ता समिती व वाणिज्य विभाग यांच्यावतीने अनुभव शिक्षा केंद्रातर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अनुभव शिक्षा केंद्र यांच्यामार्फत प्रा. सहदेव पाटकर यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळ, गटचर्चा आणि व्याख्यानाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन केले. प्रा. पाटकर यांनी विद्यार्थ्यांशी विविध खेळ व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. दैनंदिन घडामोडी, पर्यावरण, राजकारण, कला, क्रीडा, राष्ट्रीय व सामाजिक एकात्मता तसेच नेतृत्वगुण, आपल्या अंगी असणाऱ्या विविध सवयी, कलागुण व कृत्रिम बुद्धिमतत्ता याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुश्री नारकर यांनी व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. आशिष ढेकणे यांनी केले. आभार प्राध्यापिका सुचिता चव्हाण यांनी मानले. फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई संस्थेचे अध्यक्ष अनुरुद्र नारकर, उपाध्यक्ष महेश नारकर, प्रमुख कार्यवाह संदेश नारकर, खजिनदार अविनाश नारकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

