‘आरपीडी’ महाविद्यालयाला भोसले कुटुंबीयांकडून मदत
19312
‘आरपीडी’ महाविद्यालयाला
भोसले कुटुंबीयांकडून मदत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून मानसी भोसले यांनी मराठी भाषेचे प्राध्यापक (कै.) मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाकडे २५ हजारांची कायमस्वरुपी ठेव सुपूर्द केली. त्याच्या व्याजातून दरवर्षी बारावी परीक्षेत आरपीडी कॉलेजमध्ये कला, व्यापार व शास्त्र या शाखेतून मराठी विषयांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली.
डॉ. नागवेकर यांच्याकडे हा धनादेश नीरज भोसले व श्रीमती मानसी भोसले यांनी सुपूर्द केला. श्रीमती भोसले यांनी शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या ठेवीनंतर शिक्षण प्रसारक मंडळाकडे २३ लाखांहून अधिक रकमेच्या ठेवी बक्षिसांसाठी प्राप्त झालेल्या आहेत. भोसले कुटुंबियांनी शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या देणगीबद्दल अध्यक्ष विक्रांत विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, सर्व संचालक, आरपीडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक-धुरी, पर्यवेक्षक नामदेव मुठे आदींनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

