दापोलीत शिवसेना–आरपीआय युती कायम राहिल
rat२१p२४.jpg-
२६O१९२५८
दापोली ः केळसकर नाका येथील रॅलीत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम.
शिवसेना–आरपीआय युती कायम राहील
योगेश कदम ः दापोलीत येथे युतीची प्रचार फेरी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २२ ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना–आरपीआय युतीने दापोलीत काल शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीसाठी प्रयत्नशील असूनही वरिष्ठांच्या निर्देशानुसार दापोलीत प्रस्ताव दिला आहे; मात्र महायुती झाली नाही तरी शिवसेना–आरपीआय युती कायम राहील, असा विश्वास राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.
दापोली तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांसाठी शिवसेना–आरपीआय युतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. केळसकर नाका येथून प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रसंगी मंत्री कदम म्हणाले, गेली नऊ वर्षे दापोली विधानसभा मतदार संघात काम करत असून, सहा वर्षे आमदार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या कालावधीत तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकासकामे केली आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्याने छोट्या कामांसाठीही कार्यकर्त्यांना आमदार किंवा पक्ष कार्यालयाचा आधार घ्यावा लागत होता. आता आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून आले तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामे अधिक वेगाने होतील आणि दापोलीचा विकासदर वाढेल. आज जे आपल्यासोबत नाहीत ते हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला शिवसेना व आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
चौकट
शिवसेना ताकद दाखवेल
खेड नगरपालिकेप्रमाणेच या वेळीही शिवसेना आपली ताकद दाखवेल. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी नाराज न होता पक्षासाठी काम करावे आणि उमेदवारी मिळलेल्यांनी सर्वांना सोबत घेऊन प्रचार करावा, असा सल्ला मंत्री कदम यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

