आजपासून माघी गणेशोत्सव
मिरजोळे पाडावेवाडीत
आजपासून माघी गणेशोत्सव
रत्नागिरी, ता. २१ : रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथील पाडावेवाडी येथे श्री माघी गणेशोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता. २२) ते २८ जानेवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे. या निमित्ताने बहुरंगी नमन, भजने, टिपरी नृत्य, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मंडळाचे हे १४ वे वर्ष आहे. आज सायंकाळी श्रींचे आगमन मिरवणूक काढून झाले. उद्या (ता. २२) सकाळी श्रींची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर विविध भजन, बहुरंगी नमन, टिपरी नृत्य तसेच महिला व बाल सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ला रक्तदान शिबिर, २७ ला सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ला सायंकाळी श्रींची विसर्जन मिरवणूक काढली जाईल. उत्सव काळात दररोज सायंकाळी आरती होणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

