मोफत विशेष आरोग्य शिबिर
मच्छीमार बांधवांसाठी उद्या
मोफत विशेष आरोग्य शिबिर
रत्नागिरी, ता. २१ : महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालयाच्या विद्यमाने शुक्रवारी (ता. २३) मिरकरवाडा येथील मच्छीमार बांधवांसाठी विशेष बाह्य संपर्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मच्छीमार बांधवांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच पुरेशा आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे मोफत तपासणी शिबिर राबवले जात आहे.
मिरकरवाडा येथील उर्दू शाळा क्र. १० मध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांची रक्तदाब, मधुमेह आणि रक्ताची सविस्तर तपासणी केली जाईल. नेत्ररोग, दंतचिकित्सा आणि त्वचारोगावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार दिले जातील. महिलांची स्वतंत्र आरोग्य तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी आणि आरोग्य व स्वच्छतेबाबत विशेष समुपदेशनही करण्यात येणार आहे. समाजातील वाढत्या व्यसनाधिनतेवर उपाय म्हणून व्यसनमुक्ती आणि कर्करोग जनजागृतीवरही या शिबिरात भर दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

