सांगेली नवोदय विद्यालयाच्या कामांचे प्रस्ताव तातडीने द्या

सांगेली नवोदय विद्यालयाच्या 
कामांचे प्रस्ताव तातडीने द्या
Published on

19409

सांगेली नवोदय विद्यालयाच्या
कामांचे प्रस्ताव तातडीने द्या

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय सांगेली (ता. सावंतवाडी) येथे उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी भेट दिली. यावेळी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सांगेली विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपजिल्हाधिकारी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशालेच्या विविध गरजा, सुविधा या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, पालक प्रतिनिधी विष्णू जठार, तुकाराम खरात, मयुरी साखरे, सहायक अभियंता प्रमोद लोहार, प्रा. अशोक कांबळे, एच. पी. हिरेमठ, एस. के. यादव, पालक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी पुणे विभागमध्ये पहिल्या दहामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाचा समावेश असल्याबाबत अभिनंदन करण्यात आले. शैक्षणिक इमारतीमधील गळतीची समस्या सोडवण्यासाठी छतावर जी-शीट (शेड) लावणे, पायाभूत सुविधा विकास अंतर्गत विद्यालय परिसरातील अंतर्गत रस्त्याचे पुनर्कार्पेटिंग करणे, नवीन शाळेच्या इमारतीभोवती संरक्षक भिंत बांधणे, वाहनासाठी (७ आसनी) मंजुरी, च्च दाबाची विद्युत तार विद्यालय परिसरातून परिसराबाहेर स्थलांतरित करणे, जुन्या शैक्षणिक इमारतीचे नूतनीकरण, बहुउद्देशीय सभागृह, विद्यालय परिसरात हायमास्ट, शैक्षणिक इमारतीसाठी सौर ग्रीड, बास्केटबॉल पोल व कोर्ट तयार करणे याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com