सिंधुदुर्गचे खेळाडू नेमबाजीत चमकले

सिंधुदुर्गचे खेळाडू नेमबाजीत चमकले

Published on

swt227.jpg
19412
सावंतवाडीः राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंसह कांचन उपरकर, विक्रम भागले.

सिंधुदुर्गचे खेळाडू नेमबाजीत चमकले
राष्ट्रीय स्पर्धाः तिघांना ‘ट्रायल्स’, सहाजणांना ‘रिनॉन शूटर’ सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः नुकतीच ६८ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा भोपाळ व दिल्ली येथे पार पडली. या स्पर्धेत सिंधुदुर्गातील तीन खेळाडूंची ट्रायल्ससाठी निवड झाली, तर सहा खेळाडूंनी ‘रिनॉन शूटर’ हा सन्मान मिळविला. या स्पर्धेत सिंधुदुर्गमधील बारा खेळाडूंची महाराष्ट्र संघातून निवड झाली होती.
यात शिवम चव्हाण (सावंतवाडी) यांने १० मीटर एअर रायफल प्रकारात ६०७ गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेली अवनी भांगले (सावंतवाडी) हिने एअर पिस्तूल प्रकारात ५३२ गुण, राजकुमारी बगळे (कुडाळ) हिने ५३० गुण मिळवून चांगली कामगिरी केली. या तिघांची निवड ट्रायल्ससाठी झाली आहे. पहिली व दुसरी ट्रायल रायफलसाठी पुणे व पिस्तूलच्या स्पर्धा दिल्ली येथे होणार आहेत.
त्याचबरोबर सहा नेमबाज रिनॉन शूटर झाले. त्यात प्रतीक्षा सावंत हिने २५ मीटर ०.२२ पिस्तूल प्रकारात ५२४ गुण, १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात परशुराम जाधव (सावंतवाडी) याने ५३५ गुण, समर्थ बगळे (कुडाळ) याने ५२० गुण, १० मीटर पीप साईट प्रकारात गौरव आजगावकर (वेंगुर्ले) याने ६०३ गुण, हंसिका गावडे (मोरे) हिने ६०० गुण व नीलराज सावंत (सावंतवाडी) याने ६०२ गुण मिळवून चांगली कामगिरी केली. हे सर्व खेळाडू उपरकर शूटिंग अकॅडेमी सावंतवाडी व वेंगुर्ले येथे नेमबाजीचा सराव करत आहेत. त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण मिळाले. नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार विक्रम भागले यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com