

-rat२२p११.jpg-
P२६O१९४२७
गणेशगुळे : श्री गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त गुरूवारी श्रींची पालखी प्रदक्षिणा करताना सरपंच प्रसाद तोडणकर व भाविक मंडळी.
-rat२२p१२.jpg- :
२६O१९४२८
गणेशगुळे येथील मंदिरातील श्रींना भाविकांनी पुष्पमाला अर्पण केल्या.
----
माघी यात्रा---लोगो
भजन-कीर्तनाने गणेशगुळे परिसर गणेशमय
भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजला; पालखी मिरवणुकीत जयघोष
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २२ : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर येथे माघी गणेश जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून उत्सव साजरा होत असून, गणरायाचा जागर करण्यात आला. धार्मिक कार्यक्रम, भजने आणि नाटके या कार्यक्रमांनी सारा परिसर गणेशमय झाला.
जयंतीनिमित्त सकाळी ६.३० वाजता विधिवत गणेशपूजन, मंत्रपुष्पांजली, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती झाली. या सर्व उत्सवाचे नियोजन श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिराचे अध्यक्ष तथा गावचे सरपंच प्रसाद तोडणकर व सहकाऱ्यांनी केले. देवस्थान समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून उत्सव जल्लोषात साजरा केला. दुपारी १२ वा. कीर्तनकार उल्हास लाड (कसोप) यांचे जन्मोत्सव कीर्तन झाले. त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
दिवसभर विविध भजनांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रसिद्ध बुवा दामोदर लोकरे (मुंबई) यांनी आणि गणेशगुळे येथील काडसिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदेश तोडणकर यांनी भजन सेवा सादर केली. हृदय लाड व रामचंद्र बांगर यांनी सरबत वाटप व महाप्रसाद वाटप केले. तसेच सार्थक गुळेकर यांनी लाडू वाटप, अजय नागवेकर यांनी पाणी बाटलीचे वाटप केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिराचे अध्यक्ष प्रसाद तोडणकर, उपाध्यक्ष प्रज्योत गुळेकर, सचिव प्रथमेश रांगणकर, उपसचिव ओंकार वजरेकर, खजिनदार जितेंद्र तोडणकर, सहखजिनदार शैलेश जोशी, कार्याध्यक्ष विक्रम गुरव, उप-कार्याध्यक्ष संदेश मावळकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
----------
चौकट १
माघी उत्सव
गणेशगुळे येथे १९ जानेवारीपासून माघी उत्सवाला प्रारंभ झाला. दररोज गणेशपूजा, अभिषेक, मंत्रपुष्पांजली आणि महाआरती झाली. तसेच यामध्ये ढोलवादन स्पर्धा दणक्यात झाली. अक्षय थिएटर्सतर्फे इम्युनिटी, अजिंक्यतारा थिएटर्सचे (गणेशगुळे) साई माझी माय माऊली, तोडणकर ऐक्यवर्धक नाट्य मंडळ (मुंबई) यांचे वाडा चिरेबंदी ही रंगतदार नाटके सादर झाली. श्री सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे (भडे) अशोक सुर्वेबुवा, बुवा किरण कीर (नातुंडे), विठ्ठल रखुमाई भजन मंडळ (कुवारबाव) यांचे भजन उत्साही वातावरणात झाले. हळदीकुंकू कार्यक्रमालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.