रत्नागिरी-मराठा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त रविवारी कार्यक्रम
मराठा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त रविवारी विविध कार्यक्रम
सुनीलदत्त देसाई ः शिवकालीन शेतीवर कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे व्याख्यान
रत्नागिरी, ता. २२ ः येथील मराठा मंडळ संस्थेची स्थापना १९७५ ला झाली असून, संस्थेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त २५ जानेवारीला मराठा भवन येथे सुवर्ण महोत्सवी सोहळा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. गेल्या पाच दशकातील मंडळाचा प्रवास सामाजिक योगदान आणि प्रगतीचा आनंद साजरा केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष सुनीलदत्त देसाई यांनी दिली.
शहरातील मराठा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश चव्हाण, कोषाध्यक्ष कमलाकर देसाई, कार्यवाह चंद्रमोहन देसाई, उपेंद्र सुर्वे आदी उपस्थित होते. २५ जानेवारीला सकाळी ६.४५ ते ८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज पूजन व मारूती मंदिर ते मराठा भवन अशी सवाद्य पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. ८ ते १०.३० या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर आई तुळजाभवानी मराठा महिला मंडळातर्फे भजन सादर केले जाईल. ११ ते १.३० या वेळेत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यात स्मरणिका प्रकाशन, सत्कार समारंभ यांचा समावेश असेल. या वेळी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे हे ''छत्रपती शिवाजी महाराज एक महान व्यवस्थापक - शिवकालीन कृषी व्यवस्थापन व दैनंदिन जीवनातील आचरण'' या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी ३ ते ४ या वेळेत मराठा मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन केले जाईल. त्यानंतर माझी भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि अंमलबजावणी संचालनालयाचे निवृत्त उपसंचालक (इडी) डॉ. उज्वलकुमार चव्हाण ''स्वप्नांच्या उंबरठ्यावरील युवक व भविष्याचा मार्ग'' या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी ४ ते ५ या वेळेत मराठा मंडळ फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. या वेळी जागतिक विक्रमधारक लेखिका, संपादक रचना बागवे या ''स्त्री उद्योजकतेचा उद्याचा वेध'' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मराठा समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचे सत्कार, ६ ते ९.३० सांस्कृतिक विविध गुणदर्शन आणि त्यानंतर स्नेहभोजन असा कार्यक्रम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

