देवगडात रविवारपासून क्रीडा स्पर्धांचे आयोजन
देवगडात रविवारपासून
क्रीडा स्पर्धांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी (ता.२५) आणि सोमवारी (ता.२६) असे दोन दिवस क्रीडा स्पर्धाचे मंडळाने आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (ता.२५) सकाळी ७ वाजता जलद सायकल स्पर्धा (खुला गट दाभोळ तिठा ते हायस्कूल नाका व शालेय गट खाकशी तिठा ते हायस्कूल नाकापर्यंत) घेण्यात येणार आहे. यातील खुला गटातील विजेत्यांना अनुक्रमे, १५००, १००० रोख आणि दोघांनाही चषक तसेच दोन उत्तेजनार्थसाठी प्रत्येकी ५०० रूपये रोख देण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेश शुल्क १०० रूपये आहे. तर शालेय गटातील विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७०० रूपये रोख आणि दोघांनाही चषक तसेच दोन उत्तेजनार्थसाठी प्रत्येकी ३०० रूपये रोख देण्यात येतील.
यासाठी प्रवेश शुल्क ७५ रूपये आहे. याच दिवशी सकाळी ९ वाजता वैयक्तिक स्पर्धा घेण्यात येतील. यामध्ये पुरुष गट - १००, २००, ४०० मीटर धावणे, लांबउडी, गोळाफेक (प्रवेश शुल्क ५० रूपये), महिला गट -१००, २००, ४०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक (प्रवेश शुल्क ३० रूपये) घेण्यात येतील. तर सोमवारी (ता.२६) दुपारी ४ वाजता -शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धा होईल. यासाठी प्रवेश शुल्क ८०० रूपये आहे. यातील विजेत्या संघाला १० हजार रूपये रोख व चषक तसेच उपविजेत्या संघाला ७ हजार रूपये रोख व चषक देण्यात येतील. तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी ३ हजार रूपये रोख देण्यात येतील. वैयक्तिक स्पर्धाचे बक्षिस वितरण सोमवारी (ता.२६) सायंकाळी ६ वाजता येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या मैदानावर होईल. वैयक्तिक स्पर्धकांनी तसेच शुटींग व्हॉलीबॉल संघानी आपली नावे शुक्रवारपर्यंत (ता.२४) दोस्ताना सायकल स्टोअर्स किंवा विनय प्रिंटर्स यांच्याकडे द्यावीत असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

