साखरपा-गडगडी धरण कृती समिती करणार जलआक्रोश आंदोलन

साखरपा-गडगडी धरण कृती समिती करणार जलआक्रोश आंदोलन

Published on

गडगडी धरण कृती समिती
करणार जलआक्रोश आंदोलन
मुंबईतील बैठकीत निर्णय; १६ फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता २२ : गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या गडगडी धरण प्रश्नाबाबत समितीने कठोर पावले उचलत आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार दिली जाणारी आश्वासने आणि त्यातूनही न सुटणारा प्रश्न यामुळे समितीने हे कठोर पाऊल उचलले आहे.
तालुक्यातील गडगडी नदीवरील धरणाचा पाणीप्रश्न गेली चाळीस वर्षे प्रलंबित आहे. धरण बांधून झाले तरी दोन्ही बाजूचे कालवे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे धरणातून वाहत असलेले पाणी जागीच झिरपत जाते. परिणामी, धरणाच्या क्षेत्रात येणार्‍या दहा गावांचा पाणी प्रश्न तसाच भेडसावत आहे. त्यातच नजीकच्या काटवली धरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. उमरे धरणाच्या दुरूस्तीचा प्रश्नही अनेक वर्षे प्रलंबित आहे. या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आणि दिशा ठरवण्यासाठी गडगडी धरण कृती समितीची तातडीची सभा मुंबईत झाली.
आगामी अर्थसंकल्पात या प्रश्नासाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, यावर एकमत झाले. त्यामुळे शासनाचे लक्ष या मागणीकडे वेधण्यासाठी १६ फेब्रुवारीला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचे समितीने निश्चित केले आहे. या उपोषणाची दखल शासनाने न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि दुसरा टप्पा म्हणून येत्या शिमगोत्सवात निर्धार मेळावा आणि जनसंपर्क अभियान राबवण्यात येईल. तिसर्‍या टप्प्यात एप्रिलअखेर अथवा मे महिन्यात आमरण उपोषण, जनहित याचिका यासह तीव्र जलआक्रोश आंदोलन करण्यात येईल, असे समितीतर्फे जाहीर करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष घाग यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com