वेंगुर्लेत ९८ उमेदवारी अर्ज वैध

वेंगुर्लेत ९८ उमेदवारी अर्ज वैध

Published on

swt2220.jpg
19496
वेंगुर्ले ः येथील तहसील कार्यालयात उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रकिया पार पडली. यावेळी उपस्थित अधिकारी.

वेंगुर्लेत ९८ उमेदवारी अर्ज वैध
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ः रेडीतून एकच अर्ज ठरला अवैध
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २२ ः तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील सादर केलेल्या उमेदवारी अर्जातून आज झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्व ३७ अर्ज वैध ठरले. पंचायत समिती गणातील ६२ उमेदवारी अर्जातून एक अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांनी आज दिली.
येथील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकारी हेमंत किरुळकर व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सार्वत्रिक निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता छाननी प्रक्रिया येथील तहसील निवडणूक कार्यालयात पार पडली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत ८२ उमेदवारांनी सादर केलेल्या ९९ उमेदवारी अर्जातून पंचायत समिती रेडी गणातून सानिया भोसले (अपक्ष) यांचा एकच अर्ज अवैध ठरला. मात्र, त्यांचा जिल्हा परिषद गटात सादर केलेला अर्ज वैध ठरला.
जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या छाननीत तुळस-सर्वसाधारण महिला जागेसाठी सुजाता पडवळ (अपक्ष), अदिती नाईक (अपक्ष) पल्लवी आरमारकर (ठाकरे शिवसेना), योगिता परब (शिंदे शिवसेना), म्हापण-सर्वसाधारण महिला जागेसाठी वंदना किनळेकर (अपक्ष), प्रतिक्षा पाटकर (ठाकरे शिवसेना) ,प्रणिती आंबडपालकर (अपक्ष), यज्ञा साळगांवकर (शिंदे शिवसेना), उभादांडा-सर्वसाधारण जागेसाठी संजय गावडे (ठाकरे शिवसेना), मनवेल फर्नाडिस (भाजपा). आडेली सर्वसाधारण जागेसाठी मनिष दळवी (भाजपा), ओंकार नाईक (अपक्ष), नित्यानंद शेणई (अपक्ष), समिधा नाईक (अपक्ष), जनार्दन कुडाळकर (अपक्ष), विजय नाईक (ठाकरे शिवसेना), ललितकुमार ठाकूर (काँग्रेस), सखाराम सारंग (राष्ट्रवादी शरद पवार गट), आपा गावडे (अपक्ष) आणि विष्णू खानोलकर (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले. रेडी सर्वसाधारण जागेसाठी चंद्रहास पांडजी (अपक्ष), उत्तम चव्हाण (अपक्ष), किरण पालयेकर (अपक्ष), नामदेव राणे (ठाकरे शिवसेना), काशिनाथ नार्वेकर (अपक्ष), प्रितेश राऊळ (भाजपा), सानिया भोसले (अपक्ष), सिद्धेश परब (अपक्ष) आणि प्रथमेश परब (राष्ट्रीय काँग्रेस) यांचे अर्ज वैध ठरले.
वेंगुर्ले पंचायत समितीच्या दहा गणांमध्ये तुळस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी सुचिता वजराठकर (शिंदे शिवसेना), अमृता साळगांवकर (अपक्ष), नयना धुरी (अपक्ष) आणि सुप्रिया मेस्त्री (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले. मातोंड नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी विशाल बागायतकर (राष्ट्रवादी शरद पवार गट), संदीप पेडणेकर (अपक्ष), रमाकांत कोंडये (ठाकरे शिवसेना), शंकर घारे (भाजपा), विजय रेडकर (अपक्ष) आणि सुप्रिया मेस्त्री (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले. रेडी सर्वसाधारण महिला जागेसाठी प्रियांका घाटवळ (भाजपा) आणि वंदना कांबळी (ठाकरे शिवसेना) यांचे अर्ज वैध ठरले.
शिरोडा सर्वसाधारण महिला जागेसाठी शितल साळगांवकर (शिंदे शिवसेना), सुमती मसुरकर (अपक्ष), हर्षा परब (अपक्ष) आणि समृद्धी कुडव (ठाकरे शिवसेना) यांचे अर्ज वैध ठरले. उभादांडा सर्वसाधारण महिला जागेसाठी साक्षी नार्वेकर (शिंदे शिवसेना) आणि गंधाली तांडेल (ठाकरे शिवसेना) यांचे अर्ज वैध ठरले. आसोली सर्वसाधारण जागेसाठी सुनील मोरजकर (अपक्ष), संजय गावडे (अपक्ष) आणि संकेत धुरी (भाजपा) यांचे अर्ज वैध ठरले.
आडेली सर्वसाधारण जागेसाठी गुणाजी राऊळ (अपक्ष), सुभाष बोवलेकर (अपक्ष), अविनाश तोरसकर (अपक्ष), जनार्दन कुडाळकर (अपक्ष), समिधा कुडाळकर (अपक्ष), नित्यानंद शेणई (ठाकरे शिवसेना), उमेश नाईक (शिंदे शिवसेना), मितेश परब (अपक्ष) आणि नितीन मांजरेकर (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले. वायंगणी सर्वसाधारण महिला जागेसाठी कृतिका माडकर (ठाकरे शिवसेना), मनस्वी साळगांवकर (अपक्ष), शितल राऊत (भाजपा), यशश्री नाईक (अपक्ष) आणि संतोषी गावडे (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले.
म्हापण सर्वसाधारण जागेसाठी गुरुनाथ मडवळ (अपक्ष), विश्वनाथ म्हापणकर (अपक्ष), निकीत राऊळ (अपक्ष), सचिन देसाई (शिंदे शिवसेना), अशोक पाटकर (ठाकरे शिवसेना), अवधूत रेगे (राष्ट्रवादी शरद पवार गट), विष्णू फणसेकर (भाजपा) आणि प्रशांती कोनकर (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले. परुळे सर्वसाधारण जागेसाठी संकेत केळुसकर (अपक्ष), वासुदेव माधव (ठाकरे शिवसेना), घनश्याम सामंत (भाजपा), मनोहर येरम (अपक्ष), अवधूत रेगे (राष्ट्रवादी शरद पवार गट), तेजस भगत (अपक्ष), सचिन देसाई (शिंदे शिवसेना) आणि प्रसाद पाटकर (अपक्ष) यांचे अर्ज आज झालेल्या छाननीत वैध ठरले. आता २७ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून मतदान चिन्हाचे वाटप होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com