चिपळूण-टॅग केलेली चार कासवे पुन्हा गुहागर किनाऱ्यावर
rat22p13.jpg-
19482
गुहागर : ‘फ्लिपर टॅग’ केलेल्यांपैकी मादी कासव अंडी घालण्यासाठी आल्याचे येथे स्पष्ट झाले.
---------
टॅग केलेली चार कासवे पुन्हा गुहागर किनाऱ्यावर
माहिती मिळणे सोपे; पुनरागमनच्या नोंदी अभ्यासासाठी महत्वाच्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : गुहागर किनाऱ्यावर सागरी कासवाच्या फ्लिपर टॅग केलेल्यांपैकी चार माद्या यंदा पुन्हा गुहागर किनाऱ्यावर अंडी घालून गेल्या आहेत. ‘फ्लिपर टॅग’ केलेल्या माद्या यंदा पुन्हा त्याच किनारी परतल्यामुळे सागरी कासवे एकाच किनाऱ्यावर अंडी घालण्यास पसंती देत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
गेल्या वर्षी कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाने गुहागर किनाऱ्यावर सागरी कासवाच्या ‘फ्लिपर टॅग’ केलेल्यांपैकी चार माद्या यंदा पुन्हा गुहागर किनाऱ्यावरच अंडी घालून गेल्या आहेत. ‘भारतीय वन्यजीव संस्थान’च्या (डब्लूआयआय) विशेष प्रकल्पांतर्गत समुद्री कासवांना ‘फ्लिपर टॅग’ लावण्यात आले होते. २०२५ मध्ये फ्लिपर-टॅगिंग प्रक्रियेअंतर्गत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ६२ मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या माद्यांना टॅग लावण्यात आले होते.
फ्लिपर टॅगिंग प्रक्रियेअंतर्गत कासवांच्या परांवर सांकेतिक क्रमांक असलेली धातूची पट्टी लावण्यात येते. या पट्टीवर टॅग करणाऱ्या संस्थेचा संपर्क क्रमांक दिलेला असतो जेणेकरून ही टॅग केलेले कासव पुन्हा सापडल्यास त्याची माहिती मिळवता येईल. त्याला पुनर्नोंद (रिकॅप्चर) असे म्हटले जाते. या पद्धतीने गुहागर किनाऱ्यावर चार माद्या ‘रिकॅप्चर’ झाल्या आहेत.
गेल्या वर्षी गुहागर किनाऱ्यावर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ५९ कासवांना फ्लिपर टॅग लावण्यात आले होते. गुहागरचा सात किलोमीटरचा किनारा हा बाग, वरचा पाट, खालचा पाट, बाजार आणि असगोली अशा पाच भागांमध्ये विभागला जातो. यामधील वरचा पाट परिसरात कासवमित्र म्हणून काम करणारे कासवमित्र शार्दुल तोडणकर यांनी ''फ्लिपर टॅग'' असणाऱ्या चार माद्यांची नोंद केली आहे. अशा प्रकारच्या मादी कासवांच्या पुनरागमनच्या नोंदी वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण, यामुळे कासवांची लोकसंख्या, पुनरागमनाचा कालावधी, अंडी घालण्याची वारंवारता आणि अधिवास निष्ठता यांचा अंदाज लावता येत असून, ही माहिती त्यांच्या दीर्घकालीन संवर्धन नियोजनासाठी अत्यावश्यक असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी सांगितली.
---------
चौकट
टॅगची माहिती
१११०९-१० - ३१ जानेवारी, २०२५ (बाग) - ८ जानेवारी, २०२६ (वरचा पाट)
१११४५-४६ - १ फेब्रुवारी, २०२५ (वरचा पाट) - १७ जानेवारी, २०२६ (वरचा पाट)
११११५-१६ - १२ फेब्रुवारी, २०२५ (बाग) - १५ जानेवारी, २०२६ (वरचा पाट)
१११९३-९४ - १२ फेब्रुवारी, २०२५ (बाग) - १७ जानेवारी, २०२६ (वरचा पाट)
--------
कोट
फ्लिपर टॅगिंगची फलश्रुती ही रिकॅप्चरिंगमध्ये असते. गेल्या वर्षी आपण गुहागर किनाऱ्यावर फ्लिपर टॅग केलेल्या माद्या यंदा पुन्हा गुहागर किनारी परतल्या आहेत. येत्या काही दिवसात फ्लिपर टॅग केलेल्या अजून काही माद्याच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्यामुळे ''फ्लिपर टॅगिंग''ची फलश्रुती आपल्याला मिळाली आहे. शिवाय यंदा देखील ''डब्लूआयआय''च्या सहकार्याने आपण ही प्रक्रिया राबवणार आहोत.
- कांचन पवार, विभागीय वनाधिकारी, कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

