केरळ-मुंबई प्रवासात प्रवाशाची बॅग चोरीस
केरळ-मुंबई प्रवासात
प्रवाशाची बॅग चोरीस
सव्वा लाखाचा मुद्देमाल पळविला
कणकवली, ता. २२ : केरळ ते मुंबई प्रवास करत असताना थ्रिजा पॉल या महिला प्रवाशाची बॅग चोरीला गेली. त्यामध्ये रोख रकमेसह मोबाईल आणि सोन्याचे दागिने, असा मिळून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी पॉल यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीप्रकरणी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थ्रिजा पॉल (वय ७३, रा.त्रिशूर, केरळ) या केरळ ते मुंबई असा गरीब रथमधून प्रवास करत होत्या. १६ जानेवारीला पहाटे ३.१० च्या सुमारास या एक्स्प्रेसने कणकवली स्थानक सोडल्यानंतर पॉल यांना त्यांच्याकडील एक हॅण्डबॅग नसल्याचे दिसून आले. लगतच्या प्रवाशांकडे विचारणा केली असता, ही गाडी कणकवलीत थांबली होती. त्यावेळी अनोळखीने ती बॅग लांबविल्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर पॉल यांनी याबाबतची फिर्याद रेल्वेतील तिकिट तपासणीसांना दिली. त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातही याबाबतची तक्रार दिली. मात्र, ही घटना कणकवली हद्दीत घडली असल्याने रेल्वेतील बॅग चोरीची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान पॉल यांच्या बॅगेतून एक सोन्याची चैन, एक आयफोन आणि ३ हजार ५०० रुपये रोख, असा एकूण १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार अवधूत गुणीजन अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

