वरवडे-फणसनगर येथे 
१३ हजाराचा गुटखा जप्त

वरवडे-फणसनगर येथे १३ हजाराचा गुटखा जप्त

Published on

वरवडे-फणसनगर येथे
१३ हजारांचा गुटखा जप्त
कणकवली, ता. २२ : वरवडे फणसनगर (ता. कणकवली) येथे विक्रीसाठी प्रतिबंध केलेला १३ हजार १८० रुपयांचा गुटखा कणकवली पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी शक्‍ती अय्यर तेवर (वय ५०, रा. वरवडे, फणसनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.
कणकवली पोलिसांना वरवडे फणसनगर येथे प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटख्याची विक्री आणि अवैधरित्‍या साठवणूक केली जात असल्‍याची गुप्त माहिती मिळाली होती. त्‍यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे, हवालदार विनोद चव्हाण, पोलिस स्वप्नील ठोंबरे आदींनी मध्यरात्री १२.१० च्या सुमारास वरवडे फणसनगर येथील शक्‍ती तेवर याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली. त्‍यावेळी घराच्या डावीकडील बाजूस असलेल्‍या पडवीमध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधीत असलेला पानमसाला आणि गुटख्याची पाकिटे आढळून आली. एकूण १३ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. या प्रकरणी शक्‍ती तेवर याच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विनोद चव्हाण अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com