''भोसले इंटरनॅशनल''चे रेखाकला परीक्षेत यश

''भोसले इंटरनॅशनल''चे रेखाकला परीक्षेत यश

Published on

19584

‘भोसले इंटरनॅशनल’चे
रेखाकला परीक्षेत यश
सावंतवाडी, ता. २३ ः शासकीय रेखाकला परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने उत्तम यश प्राप्त करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी एकूण २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ग्रेड ‘ए’ मध्ये ४ विद्यार्थी, ग्रेड ‘बी’ मध्ये ६ विद्यार्थी तर ग्रेड ‘सी’ मध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये ग्रेड ‘ए’ मध्ये २ विद्यार्थी, ग्रेड ‘बी’ मध्ये ६ विद्यार्थी आणि ग्रेड ‘सी’ मध्ये ८ विद्यार्थी यशस्वी ठरले. विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com