रत्नागिरी- विद्यार्थ्यांची मृदा सर्वेक्षण प्रयोगशाळेला भेट

रत्नागिरी- विद्यार्थ्यांची मृदा सर्वेक्षण प्रयोगशाळेला भेट

Published on

rat23p3.jpg-
19566
रत्नागिरी : पोमेंडी खुर्द येथील मृदा सर्वेक्षण प्रयोगशाळेची माहिती घेताना देव, घैसास, कीर महाविद्यालयाचे विद्यार्थी.
----------

देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांची मृदा सर्वेक्षण प्रयोगशाळेला भेट
रत्नागिरी, ता. २३ : देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र आणि भूगोल विभागातर्फे पोमेंडी खुर्द येथील महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेला क्षेत्रभेट देण्यात आली.
क्षेत्रभेटीमध्ये उपकृषी अधिकारी रवींद्र खरात यांनी मृदा नमुना संकलन, मृदेतील आवश्यक घटक, सेंद्रिय घटकांचे प्रमाण या विषयी माहिती दिली. मृदा चाचणी प्रयोगशाळेतील उपकरणांबद्दल माहिती देण्यात आली. पीएच मीटर, कंडक्टोमीटर, फ्लेम फोटोमीटर, हॉट एअर ओव्हन, स्पेक्ट्रॉफोटोमीटर, डिस्टिलेशन युनिट, नायट्रोजन अॅनालायझर या विषयी आणि त्यावर मृदा परीक्षण कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मृदा चाचणी हा नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमातील एक घटक असल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून खूप माहिती मिळाली.
मृदा सर्वेक्षण प्रयोगशाळेतील सुषमा कदम (सहाय्यक कृषी अधिकारी), योगेश वेल्हे (उपकृषी अधिकारी), शोभा रानबरे (सहाय्यक कृषी अधिकारी), जयवंत सर्जे (सहाय्यक कृषी अधिकारी), दीक्षा मयेकर (मृदा विश्लेषक) यांनी माहिती दिली. जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि परीक्षण कार्यालय/अधिकारी डॉ. सारिका पाटील यांनी विद्यार्थ्यांना महाविस्तार - एआय अॅपविषयी माहिती दिली. क्षेत्रभेटीमध्ये भूगोल विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. आसावरी मयेकर व प्रा. मिथिला वाडेकर उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com