रत्नागिरी- मराठी भाषा विचार, संवेदनांची ताकद

रत्नागिरी- मराठी भाषा विचार, संवेदनांची ताकद

Published on

rat23p17.jpg-
19677
रत्नागिरी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शन व मराठी भाषा उपक्रमात बोलताना नमिता कीर. डावीकडून विभावरी जोईल, शशांक नाईक आणि हेमंत काळोखे.
------------
मराठी भाषा विचार, संवेदनांची ताकद
नमिता कीर; जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शन
रत्नागिरी, ता. २३ : मराठी शिकणे म्हणजे फक्त भाषा नव्हे ती आपल्या विचारांची, संवेदनांची ताकद आहे. भाषा आपली ओळख आहे आणि ती जपणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर यांनी केले.
कुवारबाव येथे आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथप्रदर्शन आणि विविध कार्यक्रमांचे उद्घाटन केल्यावर त्या बोलत होत्या. त्यांनी ‘भारतीय ज्ञानप्रणाली ग्रंथदालन’ उद्घाटन करून ते सर्व वाचकांसाठी उपलब्ध करून दिले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक, रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे कर्मचारी, कार्यकारिणी सदस्य तसेच मराठी भाषेवर प्रेम करणारे असंख्य ग्रंथप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका विभावरी जोईल यांनी “मराठी भाषेचा प्रचार-प्रसार होण्यासाठी प्रमाण भाषेबरोबरच मराठी बोलीभाषांचा दैनंदिन आयुष्यात सक्रिय वापर आवश्यक आहे, असे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे यांनी केले. या वेळी शशांक नाईक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com