रत्नागिरी- गणपतीपुळेत भक्तांची प्रचंड गर्दी
rat23p18.jpg
19678
रत्नागिरी ः तालुक्यातील गणपतीपुळे येथे यात्रेला झालेली गर्दी.
---------
गणपतीपुळेत यात्रोत्सवाला भाविकांची गर्दी
महाप्रसाद, बुंदी लाडूचे वाटप ; श्रींची पालखी प्रदक्षिणा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे गुरूवारी (ता. २२) माघी यात्रा उत्सव अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात साजरा झाला. स्थानिकांची यात्रा म्हणून ओळख असलेल्या या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह पंचक्रोशीतून भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
माघी यात्रेनिमित्त पहाटे ५ वाजता मंदिराचे द्वार उघडण्यात आले. मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची विधीवत पूजाअर्चा, मंत्रपुष्पांजली आणि आरती झाली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. भंडारपुळे, नेवरे, कोतवडे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर, खंडाळा, जयगड आणि जाकादेवी या भागांतून स्थानिक भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. भाविकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून श्रींचे दर्शन घेतले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समिती, ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने उत्तम समन्वय राखला होता.
सांगली जिल्ह्यातील माघी गणेश मंडळाच्यावतीने हजारो भाविकांसाठी मोफत महाप्रसाद आणि बुंदी लाडूचे वाटप केले तसेच, यात्रेनिमित्त जिल्ह्यासह घाटमाथ्यावरून आलेल्या व्यापाऱ्यांनी विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. घरगुती वस्तू आणि खेळण्यांच्या खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी ४.३० वाजता ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींची पालखी प्रदक्षिणा झाली. या वेळी देवस्थानचे सरपंच नीलेश कोल्हटकर, सर्व पंच, पुजारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

