डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना
वैद्यकीय अधीक्षकपदी बढती

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना वैद्यकीय अधीक्षकपदी बढती

Published on

19697
डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना
वैद्यकीय अधीक्षकपदी बढती

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (वर्ग एक) या पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे पद रिक्त होते. अखेरीस राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या मान्यतेने डॉ. ऐवळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. ऐवळे हे गेली तब्बल ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्त्रीरोग तज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत. १९९६ पासून सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांमध्ये त्यांनी दरमहा सरासरी १०० स्त्री प्रसूती केसेस यशस्वीरीत्या हाताळल्या आहेत. त्यांनी १९९८ ते २००६ या कालावधीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००६ ते २०१५-१६ या कालावधीत दोडामार्ग येथे सेवा बजावली. २०१६ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत पुन्हा सावंतवाडीत कार्यरत होते. २०१७ ते २०२३ या काळात त्यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात सेवा दिली. २०२३ नंतर सध्या ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दीर्घ अनुभव, प्रामाणिक सेवा व मातृ-शिशु आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल वैद्यकीय वर्तुळासह सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या नियुक्तीसाठी पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com