देवगडमध्ये लोकशाही सशक्त करण्याचा निर्धार
19708
देवगडमध्ये लोकशाही सशक्त करण्याचा निर्धार
मतदार दिन उत्साहात; नवमतदारांना ओळखपत्रे, मतदार जागृती फेरी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः येथील तहसील कार्यालयात तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नवमतदारांना ओळखपत्र देण्यात आली. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांसाठीची शपथ ग्रहण करण्यात आली. मतदार जागृती फेरी काढून लोकशाही सशक्त करण्याचा निर्धार करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारीला साजरा करण्यात येतो. यंदा शासकीय सुटी असल्याने आज तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांसाठीची शपथ ग्रहण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार रमेश पवार, नायब तहसीलदार विवेक शेट, महसूल नायब तहसीलदार संतोष खरात, निवडणूक नायब तहसीलदार छाया आखाडे, पुरवठा निरिक्षक अधिकारी संग्राम गुट्टे, तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशिद, निवडणूक महसूल सहाय्यक रमेश मोरे तसेच महसूल कर्मचारी आणि नवीन मतदार उपस्थित होते.
यावेळी शपथ ग्रहण करण्यात आली. तहसीलदार पवार यांनी, राष्ट्रीय मतदार दिवासाच्या कार्यक्रम लोकशाही आणि मतदारांसाठी किती महत्वाचा आहे याची माहिती दिली. प्रदीप कदम यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व विषद केले. यावेळी नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने येथील महाविद्यालय परिसरापासून मुख्य रस्त्यापर्यंत मतदार जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार छाया आखाडे, प्राचार्य विजयकुमार कुनुरे, लक्ष्मण सुरवसे, प्रा. श्रीकांत सिरसाठे, कार्यक्रम अधिकारी महेंद्र कामत, सहायक कार्यक्रम अधिकारी तन्वी घारे, अभिषेक मेस्त्री, प्रदीप कदम, रमेश मोरे आदी सहभागी झाले होते. फेरीमध्ये घोषणाबाजी करीत जनजागृती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

