राज्य ॲथलेटिक्ससाठी ४४ जणांची निवड

राज्य ॲथलेटिक्ससाठी ४४ जणांची निवड

Published on

19790

राज्य ॲथलेटिक्ससाठी ४४ जणांची निवड

सिंधुदुर्गनगरीतील स्पर्धा; ‘हौशी ॲथलेटिक’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक असोसिएशनतर्फे सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे घेतलेल्या सबज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेमधून ४४ मुली व मुलांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली आहे. राज्यस्तर स्पर्धा कोपरगाव येथे ७ व ८ फेब्रुवारीला होणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्पना तेंडुलकर, बाळकृष्ण कदम, रामदास देशमुख, समीर झाटये, लक्ष्मी परब, दर्शना साळकर, संदीप पेडणेकर, दिलीप मालवणकर, अमित लिंगवत, विजय सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
राज्य स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू असे ः आठ वर्षांखालील मुली/मुले-झोया शेख ५० मीटर (सावंतवाडी), सानिका वाडकर-५० मीटर (सावंतवाडी), इशितकुमार वळवी-५० व १०० मीटर (ओरोस), रियांश कासले ५० व १०० मीटर (कुडाळ), समर्थ वाडकर ५० व १०० मीटर (सावंतवाडी). १० वर्षांखालील मुलगे व मुली-निहाल जाधव ५० मीटर, १०० मीटर, प्रज्ञेश खाडे ५० मीटर, १०० मीटर (वैभववाडी), पारस परब-५० मीटर, स्टँडिंग ब्रॉड जंप-हिंदवी दळवी (कुसबे) लांब उडी, १०० मीटर, स्वरा पेडणेकर (वेंगुर्ले) १०० मीटर, ५० मीटर, आनंदी धोंड (सावंतवाडी)-५० मीटर आणि लांब उडी, पारिधी शिंदे (वैभववाडी)-१०० मीटर आणि लांब उडी. बारा वर्षांखालील मुली व मुलगे-सर्वेश यादव (लांब उडी), प्रणव गावडे (गोळा फेक), मिथिलेश साळकर (गोळा फेक, लांब उडी), तन्मय कांबळे (गोळा फेक), गुंजन दळवी (कुसबे, गोळा फेक), स्वराली सिनलकर (कुसबे, गोळाफेक व लांब उडी), वीरा कदम (कुसबे, गोळफेक), मानसी कसालकर (लांब उडी, ३०० मीटर), अनघा शिवलकर-लांब उडी, ३०० मीटर, निरंजन खाडे (वैभववाडी)- ६० मीटर, निहार परब (कुसबे)- ६० मीटर, किरण मोरे (कुसबे)-६० मीटर, मैथिली गावडे-३०० मीटर, अभिर पेडणेकर (तळवडे)-८० मीटर, मुद्रा वाणी-गोळा फेक, सिया आवळेगावकर-गोळफेक, सौम्या मेस्त्री-गोळाफेक. चौदा वर्षांखालील मुलगे व मुली-महिमा मोहिते-लांब उडी, ८० मीटर (मालवण). दिया मालवणकर-८० मीटर आणि लांब उडी (वेंगुर्ले). मान्यता पेडणेकर-लांब उडी (वेंगुर्ले), अभिर पेडणेकर-लांब उडी व ८० मीटर, हर्षित नाईक-लांब उडी व ८० मीटर, अमेय चोरगे (ओरोस)-८० मीटर, ओजस्वी भोसले (वैभववाडी)-८० मीटर, आस्था लिंगवत (सावंतवाडी)-३०० मीटर, प्रांजल पाटील (वैभववाडी)-३०० मीटर, दीप्ती परब (कुडाळ)-३०० मीटर, मंथन जाधव-गोळा फेक, गणेश शेळके-गोळा फेक, ओम चव्हाण-गोळा फेक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com