असलदे उगवतीवाडीत 
गणेश जयंती उत्साहात

असलदे उगवतीवाडीत गणेश जयंती उत्साहात

Published on

19792

असलदे उगवतीवाडीत
गणेश जयंती उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २४ ः असलदे उगवतीवाडी येथील ब्राह्मणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश जयंती उत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी (ता. देवगड) बुवा संतोष जोईल विरुद्ध श्री निनादेवी प्रासादिक भजन मंडळ, उंडील बुवा व्यंकटेश नर यांच्यामध्ये झालेल्या डबलबारी सामन्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उत्सवाला पालकमंत्री नीतेश राणे, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
गणेश पूजन, श्री सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद, हळदीकुंकू, मान्यवरांचे सत्कार, स्थानिक वारकरी भजने असे कार्यक्रम पार पडले. डबलबारी भजन सामन्यात बुवा संतोष जोईल व व्यंकटेश नर यांनी कोकणातील सुंदर निसर्ग, मोबाईलचा अतिवापर, आई-वडिलांची सेवा, पती-पत्नींमध्ये सुसंवाद याबाबत भजनातून प्रबोधन केले. या कार्यक्रमासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com