निगुडे येथे मंगळवारपासून
पुनप्रतिष्ठापना वर्धापन दिन

निगुडे येथे मंगळवारपासून पुनप्रतिष्ठापना वर्धापन दिन

Published on

19802

निगुडे येथे मंगळवारपासून
पुनप्रतिष्ठापना वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः निगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थान येथे पुनर्प्रतिष्ठापनेचा पहिला वर्धापन दिन मंगळवार (ता.२७) व बुधवारी (ता.२८) या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
मंगळवारी (ता. २७) सकाळी ८ वाजता मंगलाचरण, प्रायश्चित्त विधी, यजमानांचे शरीरशुद्धीसाठी पंचगव्य प्राशन, सर्व देवतांना आवाहन-प्रार्थना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्य वरण, प्राकारस्थल शुद्धी, मुख्यदेवता स्थापना, सप्तशक्ती पाठवाचन, सुहासिनींसाठी कुंकुमार्चन, परिवार देवतांवर अभिषेक पूजन आदी विधी, ११ वाजता सुवासिनींसाठी कुंकुमार्चन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता शा. सं. श्री गणेश उर्फ राजू जोशी यांचे प्रवचन, बुधवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता रोणापाल, इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली गावच्या शिमघडे, मानकरी व ग्रामस्थांचे आगमन व स्वागत होईल. ९.३० वाजता मंगलाचरण, अग्निस्थापना, सग्रहमख, सप्तशती हवन, सत्यनारायण महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आचार्यादी ब्राह्मण पूजन, कुमारिका पूजन, कुष्मांड बलिदान, देवतांना प्रार्थना-आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता माऊली देवीचे दर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे कार्यक्रम, रात्री ८ वाजता ऐतिहासिक महानाट्य गणेश कला आणि सांस्कृतिक मंडळ, हळर्ण (किल्ला गोवा) यांच्या सादरीकरणाने सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान प्रमुख मानकरी, नवरात्र उत्सव समिती, महिला कमिटी तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष रवींद्र गावडे, सचिव गुरुदास गवंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com