कोल्हापुरात ३० जानेवारीपासून ''दालन'' प्रदर्शन
कोल्हापुरात ३० पासून ‘दालन’ प्रदर्शन
के. पी. खोत ः बांधकामविषयक माहिती मिळणार एकाच छताखाली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या ''क्रेडाई कोल्हापूर''च्या वतीने वास्तू व बांधकामविषयक प्रदर्शन ''दालन २०२६'' चे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल ग्राउंड येथे हे प्रदर्शन भरणार असल्याची माहिती क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत दिली.
रत्नागिरीतील क्रेडाई प्रदर्शनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘१९९२ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे हे १३वे वर्ष आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ३० ला सकाळी ११ वाजता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे व उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विशेष तांत्रिक सत्रे, केवळ घरांची विक्री न करता बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १८० स्टॉल असणार आहेत.
३१ जानेवारीला मुंबईचे तज्ज्ञ प्रो. एम. जी. गाडगीळ हे ''Innovative Solutions for modern-day complex structures'' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. १ फेब्रुवारीला प्रख्यात लेखक आणि विचारवंत अच्युत गोडबोले यांचे एआय आणि बदलणारे जग या विषयावर व्याख्यान होईल. याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रदर्शनाला भेट देणार आहेत. २ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रदर्शनाचा समारोप होईल. या वेळी महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

