रस्ता खुला करा, अन्यथा मत नाही!
19825
रस्ता खुला करा; अन्यथा मत नाही!
ओझरमवासीयांचा इशारा; फौजदारवाडी मार्ग बंद असल्याने गैरोसोय
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २४ : ओझरम (ता.कणकवली) फौजदारवाडी, आनंदवाडी, भंडारवाडीतील रस्ता गेली अनेक वर्षे बंद आहे. हा भाग दुर्गम व जंगली भागात येत असून, रस्ता बंद असल्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्धांसह ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. हा रस्ता त्वरित खुला करावा; अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओझरम गावातील फौजदारवाडी, आनंदवाडी, भंडारवाडीतील रस्ता गेली ३५ ते ४० वर्षे बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याबाबत वेळोवेळी निवेदन व स्थानिक प्रशासनाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. शासनाने रस्ता बंद करणाऱ्यांवर कारवाई करून त्वरित रस्ता खुला करून द्यावा; अन्यथा ५ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच नागरिकांची गैरसाय टाळण्यासाठी कासार्डे व ओझरम सर्व रस्ते खुले करण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन कणकवली प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस ठाणे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर दर्पण राणे, मंगेश राणे, मिलिंद राणे, अनंत राणे, सतीश राणे, वसंत सावंत, रामचंद्र बिर्जे, सुभाष तावडे, गणेश तावडे, नागेश तावडे, मनोहर राणे, वासुदेव राणे, विलास तावडे, मोहन राणे, रघुनाथ तावडे, वैशाली तावडे, हर्षद सावंत, सान्वी तावडे, अरुणा बिर्जे, कुंदा राणे, चंद्रकांत सावंत, नीलिमा सावंत, वैभव बिर्जे, सुप्रिया राणे, आरती राणे, वसुमती राणे, वैष्णवी राणे, सचिन राणे यांच्यासह ४४ ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

