परंपरेतील ज्ञानाची क्षेत्रे शोधा

परंपरेतील ज्ञानाची क्षेत्रे शोधा

Published on

-rat24p13.jpg-
P26O19826
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना गजानन लोंढे.
---------
भारतीय परंपरेतील ज्ञानाची क्षेत्रे शोधा
गजानन लोंढे ः गोगटे महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : गुरुकुल परंपरेतील हुशार विद्यार्थी पुढचा आचार्य होत होता. ही भारताची समृद्ध परंपरा होती. अभिजात भारतीय भाषांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. परंपरागत ज्ञानाची क्षेत्रे शोधा. प्रदेशाप्रदेशातील लोकविद्या समोर आणा, कमाल कल्याण आणि किमान उपभोग हे भारतीय तत्त्वज्ञानाचे सार शिक्षणातून पुढे यावे तरच प्रत्येक भारतीय शिक्षणातून ग्लोबल सिटिजन होईल, असे प्रतिपादन गजानन लोंढे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेतर्फे आयोजित बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते. विवा एक्झिक्युटिव्ह येथे विकसित भारत २०४७ साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि भाषा, मानव्यविद्या, सामाजिक शास्त्राची भूमिका या विषयावर ही परिषद झाली.
लोंढे म्हणाले, भारतातील राष्ट्रीय धोरणाचा विषय स्पष्ट करताना १९६८ च्या धोरणाकडे राष्ट्रीय एकात्मता तर १९८६च्या धोरणाकडे सर्व शिक्षा आणि २०२०च्या धोरणाकडे वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर येऊन या संस्कृतीत रुजलेल्या विषयांना जगाच्या पटलावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, या दृष्टिकोनातून पाहावे.
पाश्चात्त्य लोक बाहेरील वस्तूंना जास्त महत्त्व देतात. भारतीय शाश्वत जीवनशैलीद्वारे आंतरिक शांततेला महत्त्व देतात. चारित्र्य, जिज्ञासा आणि सृजन हे शिक्षणातून घडायला हवे. मुलाच्या वयाच्या विकासाबरोबरच त्याच्या शिक्षणाच्या अध्यापन शास्त्राचा विकास गरजेचा आहे, हे वास्तव आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
---------
चौकट १
विद्यार्थी, प्राध्यापकांचा सहभाग
आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ऑफलाईन १८ व ऑनलाईन २९ असे ४७ संशोधन पेपर्स सादर करण्यात आले तसेच ३५ पोस्टर्स सादर करण्यात आली. असे आंतरविद्याशाखीय एकूण ८२ पेपर्स सादर करण्यात आले. या परिषदेतून विविध विषयांवरील माहिती संकलित करण्यात आली असून, त्या अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com